एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? 'त्या' बॅनरने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Eknath Shinde Future CM Banner In Pune: एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार, असा दावा करणारा पुण्यातील बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. दहीहंडीच्या निमित्ताने झळकलेल्या या फ्लेक्समुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde CM speculation after Pune political banner
Eknath Shinde CM speculation after Pune political bannersaam tv
Published On

पुणे: दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरात राजकीय फ्लेक्सबाजी रंगली असून, हांडेवाडी भागात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी लावलेला एक फ्लेक्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Eknath Shinde CM speculation after Pune political banner
Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; निष्ठावंत नेत्याचा राजीनामा,४ माजी नगरसेवकांसह शिवसेनेत करणार प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह "लाडका भाऊ लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असा थेट मजकूर या फ्लेक्सवर छापण्यात आला आहे. तसेच यावर "लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असेही नमूद करण्यात आले असून शिवसेनेचे संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटोही या फलकावर स्पष्टपणे दिसून येत आहेत.

Eknath Shinde CM speculation after Pune political banner
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर या चर्चांना जोर आला होता. तसेच देवेंद्र फडणवीस हे उपपंतप्रधान होणार असा दावा अलीकडेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे अशा वातावरणात पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात एकनाथ शिंदे यांना 'भावी मुख्यमंत्री' म्हणून प्रस्थापित करणारे फ्लेक्स लागल्यामुळे राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Eknath Shinde CM speculation after Pune political banner
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

दहीहंडीच्या मुहूर्तावर झळकलेल्या या पोस्टरने शहरातील नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले असून, महायुतीमधील राजकीय समीकरणांवर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com