ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची बॅनरबाजी; शिवाजी पार्क परिसरात बॅनर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv
Published On

रुपाली बडवे

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजप आणि शिंदे गट एकत्र येत सरकार स्थापन केले आहे, भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले आहे. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्री पद दिले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. राज्यात शिंदे यांच्या विरोधात तर काही ठिकाणी शिवसैनिकांनी समर्थनात रॅली काढली असल्याचे बोलले आहे. काल शिंदे गटाने विधानसभा अधिवेशनात पहिला विजय मिळवला आहे. आज बहुमत चाचणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या दादर येथे एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावले आहेत.

Eknath Shinde
भाजप मोहित कंबोज यांना राज्यपाल नियुक्त आमदार करणार?; 'या' नेत्यांना मिळणार संधी

दादर परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनात पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये 'निष्ठावंत शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे' असा उल्लेख करण्यात आला आहे. दादर हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणीच एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावल्यामुळे आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

Eknath Shinde
शिंदे-फडणवीस सरकारची दुसरी परीक्षा; आज विश्वासदर्शक ठराव होणार

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना (Shivsena) गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांनी दिली आहे. ( shivsena Political Crisis News In Marathi)

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या पक्षातर्फे शिंदेवर मोठी कारवाई केली होती. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवलं होतं. त्यांच्याजागी आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाने देखील अजय चौधरी यांच्या गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com