शिंदे-फडणवीस सरकारची दुसरी परीक्षा; आज विश्वासदर्शक ठराव होणार

आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.
Eknath Shinde and devendra fadnavis
Eknath Shinde and devendra fadnavissaam tv

मुंबई - विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. पहिल्या कसोटीत शिंदे-फडणवीस सरकारने बाजी मारील. आज दुसऱ्या दिवशी या सरकारसाठी दुसरी कसोटी असणार आहे. आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिंदे-फडणवीस सरकारला आज विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे नव्या सरकारची आज दुसरी कसोटी असणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. त्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे.

हे देखील पाहा -

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

दरम्यान, शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या पक्षातर्फे शिंदेवर मोठी कारवाई केली होती. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवलं होतं. त्यांच्याजागी आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाने देखील अजय चौधरी यांच्या गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Eknath Shinde and devendra fadnavis
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून समन्स

आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते पद म्हणून मान्यता रद्द केली आहे. आता त्याजागी पुन्हा एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून नियुक्ती कायम ठेवली आहे. तसेच आमदार सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करून त्याऐवजी आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव शिवदर्शन साठ्ये यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com