मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून समन्स

मनी लाँड्रिंग प्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू आहे.
Sanjay Pandey News updates
Sanjay Pandey News updatesSaam TV

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स पाठवले आहे. ५ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

संजय पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा पोलीस (Police) सेवेत सुरू केली. त्यांनी त्यांच्या फर्ममध्ये त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केले.

Sanjay Pandey News updates
'शिंदे-फडणवीस' सरकारचं उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीत काय होणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

२०१० ते २०१५ दरम्यान, त्या फर्मला एनएसई (NSE) सर्व्हर आणि सिस्टमसाठी कंत्राट देण्यात आले होते. यापूर्वी या प्रकरणाचा तपास सीबीआयने (CBI) केला होता आणि आता ईडी तपास करत आहे, यामध्ये संजय पांडे यांना तपास यंत्रणेने समन्स बजावले आहे.

Sanjay Pandey News updates
Sharad Pawar on Gov. | शिंदे सरकार पाच-सहा महिने टिकेल, मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा : शरद पवार

संजय पांडे यांना एप्रिल २०२१ मध्ये त्यांना ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या डीजीपी (DGP) पदाची जबाबदारी दिली. मात्र, आयपीएस रजनीश सेठ यांची महाराष्ट्राच्या डीजीपीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हे मुंबई पोलिसांचे (Police) ७६ वे पोलीस आयुक्त होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com