माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या अटकेनंतर खासदार संजय राऊतांना ईडीचं समन्स

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. त्यामुळे ईडीने संजय राऊतांना (Sanjay Raut ) उद्या म्हणजे बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे
sanjay pandey and sanjay raut
sanjay pandey and sanjay raut saam tv
Published On

सूरज सावंत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. त्यामुळे ईडीने संजय राऊतांना (Sanjay Raut ) उद्या म्हणजे बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने याआधी देखील संजय राऊतांची पत्राचाळ प्रकरणी चौकशी केली आहे. (Sanjay Raut News In Marathi )

sanjay pandey and sanjay raut
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीच्या मुंबई कार्यालयाने गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी बुधवारी ११ वाजता चौकशीसाठी समन्स जारी केलं आहे. संजय राऊतांची या घोटाळ्याप्रकरणी याआधी देखील चौकशी ईडीने केली आहे.

आज ईडीने (ED) संजय राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणात सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची चौकशी केली. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे व्यवसायिक मित्र आहेत. स्वप्ना पाटकर यांच्या नावाने संजय राऊत यांनी अलिबागमधील जमिनीची खरेदी केल्याचा आरोप आहे. तर जमिनीचे ४ प्लॉट हे स्वप्ना पाटकर यांच्या नावे आणि ४ प्लॉट राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर या दोघांची ईडी कार्यालयात सकाळी ११ पासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता संजय राऊत यांना ईडीने उद्या चौकशीसाठी बोलावलं आहे.

sanjay pandey and sanjay raut
सेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक; म्हणाले...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून अटक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आज ईडीकडून (ED) चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. ईडीच्या चौकशीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन हे बेकायदेशीरपणे टॅप केल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे १९९७ पासून हे फोन बेकायदेशीररित्या टॅप केले जात असल्याचा आरोप पांडे यांच्यावर होता. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू होती. पांडे हे चौकशीत सहकार्य करत नसल्याची तक्रार ईडीने दिल्लीत कोर्टात सांगितली होती. दरम्यान, आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना ईडीने अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com