सेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक; म्हणाले...

शिवसेनेची उतरती कळा सुरूच आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी १२ खासदारांच्या शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
aditya Thackeray
aditya Thackeray saam tv
Published On

सुमित सावंत

मुंबई : शिवसेनेला (ShivSena) आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेची उतरती कळा सुरूच आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी १२ खासदारांच्या शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. (Shivsena Political Crisis News In Marathi)

aditya Thackeray
मोठी बातमी! शिवसेनेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटाला दिला पाठिंबा

आदित्य ठाकरे म्हणाले, 'त्यांच्याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या आल्या आहेत. मला ठाऊक नाही. सगळ्यांना काही ना काही छोटे-मोठे कारण लागतं. सगळे केवळ निमित्त शोधून काढतात, खोदून काढतात. मूळ भूमिका हीच आहे की, आतापर्यंत उद्धव ठाकरेंबद्दल आणि ठाकरे कुटुंबाबद्दल त्यांच्या मनात आदर आहे असं सांगत होते. पण जो काही राग त्यांच्या मनात होता. तो आता दिसायला लागलेला आहे'

'कोणी काय बोलायचं, हे त्यांचा त्यांचा अधिकार असतो. आपल्याला माहिती आहे की, त्यांच्यासोबत तिथे उपमुख्यमंत्री होते , अशोक चव्हाण होते , सगळेच होते. त्यात आमचे उपमुख्यमंत्री कधीही माईक खेचत नव्हते. आता गद्दारांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. ते गद्दार आहेत ते जग जाहीर आहे, गद्दार हा गद्दारच असतो आणि किती लोकांना काही पटवून देऊ द्यात,असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

aditya Thackeray
'उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करायला तयार होते, पण...'; खासदार राहुल शेवाळे यांचा गौप्यस्फोट

'आतापर्यंत सगळे खोटे बोलायचे की उद्धव ठाकरेंबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. पण जे काही त्यांच्या मनातलं राग , घृणा आहे. पण जे मनात होतं ते लोकांसमोर आता दिसायला लागलेला आहे, असे रामदास कदमांच्या आरोपावर आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं.

शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिकार हे पक्षप्रमुखांकडे आहेत. आता ही सगळी सर्कस सुरू झालेली आहे. उद्यापासून एक महत्वाची केस सुरू होत आहे. ही केस केवळ शिवसेनेसाठी महत्वाची आहे. तसेच देशासाठी महत्वाची राहील. कारण या देशात लोकशाही आहे की नाही ? टिकणार की नाही ? याच्यावर उद्या निकाल लागणार आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com