अजय दुधाने, साम टीव्ही
अंबरनाथमध्ये हुंड्यासाठीच्या कथित छळाला कंटाळून एका २६ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच या विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पती, सासू आणि दीराविरोधात गुन्हा दाखल करत तिघांनाही अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशाखा टिळेकर असं मृत नवविवाहितेचं नाव असून तिचं ३० एप्रिल २०२६ रोजी अंबरनाथमधील डॉ. नितीन टिळेकर याच्यासोबत लग्न झालं होतं. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, लग्नानंतर विशाखावर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू करण्यात आला. लग्नात अपेक्षेप्रमाणे मानपान मिळालं नाही तसेच माहेरून पैसे आणि दागिने आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता.याशिवाय तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
विशाखाला माहेरच्या नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यासही मज्जाव करण्यात आला होता.दोन दिवसांपूर्वी शेजारच्या महिलेशी बोलल्याच्या कारणावरून तिच्यावर मारहाण झाल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे.आत्महत्येपूर्वी विशाखाने आईला फोन करून आपल्यावर होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. तिचे आई-वडील तिला माहेरी घेऊन जाण्याची तयारी करत असतानाच विशाखाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंड्यासाठी छळ करणे यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी पती डॉ.नितीन टिळेकर,त्यांची आई आणि दिराला अटक केली असून न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत असून हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे अंबरनाथमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.