नवऱ्यासोबत ठरली शेवटची ट्रिप; इंजिनीअर महिलेचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, ७ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

engineer woman death : महिलेची नवऱ्यासोबत शेवटची ट्रिप ठरली आहे. इंजिनीअर महिलेचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
engineer woman news
engineer woman death Saam tv
Published On
Summary

उत्तराखंडमध्ये इंजिनीअर महिलेचा संशयास्पद मृत्यू

इंजिनीअर महिलेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

पोलिसांकडून तपासाला सुरूवात

उत्तराखंडच्या मसुरीमध्ये होम स्टेमध्ये थांबलेल्या इंजिनीअर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. महिलेच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे.

मसुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पोलिसांना महिलेच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली. होम स्टेच्या एका खोलीत एक महिला कोणतीही हालचाल करत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. पी राधा गायत्री असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला दिल्लीची असून फिरण्यासाठी नवऱ्यासोबत उत्तराखंडच्या मसुरी येथे आली होती.

engineer woman news
Crime News: लग्नाच्या तीन महिन्यांत नव्या नवरीची गर्लफ्रेंडच्या घरात पतीने केली हत्या; मृतदेह बाथरूममध्ये लपवून दोघेही फरार

पोलिसांच्या विशेष पथकाने खोलीची तपासणी केली. बेडच्या चादरीवर रक्ताचे डाग आढळले. खोलीत मद्य आणि खाद्य पदार्थ आढळले. पी. राधा यांच्या पतीने पोलिसांनी सांगितले की, आम्ही दोघांनी दारूचे अधिक सेवन केलं होतं'.

तत्पूर्वी, दोघांचं लग्न ८ नोव्हेंबर २०२५ रोजी झालं. दोघेही आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. नवरा पुण्यात कामाला आहे, तर महिला गुरुग्राम येथे कामाला होती. पोलिसांनी सांगितलं की, 'पी राधा ही पती सौम्या श्रीचरणसोबत १३ जून रोजी दिल्लीहून ऋषिकेश येथे आले होते. जोडप्याने १४ जून रोजी मुसरी येथील 'होम स्टे'मध्ये थांबले. दोघांनी रात्री दारूचं सेवन केलं. त्यानंतर दोघे रात्री ३.३० वाजता झोपी गेले.

engineer woman news
Crime News: ४० कोटींचा जमीन व्यवहार; वादानंतर महिला वकिलाची आत्महत्या, ज्येष्ठ वकील आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल

सकाळी उठल्यानंतर पत्नीच्या नाकातून रक्त येत असल्याचे पतीने पोलिसांना सांगितले. महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com