Shreya Maskar
शनिवारवाडा हे पुण्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे. १८ व्या शतकातील एक भव्य आणि ऐतिहासिक वास्तू आहे. शनिवारवाडा मराठा साम्राज्याच्या पेशव्यांची वैभवशाली गादी म्हणून प्रसिद्ध आहे.
कसबा पेठेच्या गजबजाटाने वेढलेला शनिवारवाड्याला तुम्ही वीकेंडला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतील.
पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा थोरले बाजीराव पेशवे (पहिले बाजीराव) यांनी बांधला. त्यांनी १० जानेवारी १७३० रोजी या वाड्याचा पाया घातला होता आणि १७३२ मध्ये या भव्य वाड्याचे बांधकाम पूर्ण झाले. हे पेशव्यांचे मुख्य निवासस्थान आणि मराठा साम्राज्याचे राजकीय केंद्र होते.
अद्वितीय वास्तुकला, उत्तरेकडे तोंड असलेला भव्य 'दिल्ली दरवाजा', सायंकाळी होणारा लाइट-साउंड शो यांसाठी शनिवारवाडा प्रसिद्ध आहे.
शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे म्हणजेच दिल्लीच्या दिशेने तोंड करून असल्यामुळे प्रसिद्ध आहे.
शनिवारवाड्याच्या आवारात असलेले 'हजारी कारंजे' हे पेशवेकालीन स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कारंजे १६ पाकळ्यांच्या कमळाच्या फुलाच्या आकारात बनवले गेले होते.
मुंबईहून पुणे रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही पुढे बस किंवा रिक्षाने शनिवारवाड्याला जाऊ शकता. ही वास्तू जगात भारी आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.