Shreya Maskar
पावसाळ्यात वीकेंडला मुंबई-पुण्याजवळ फिरण्यासाठी माळशेज घाट हे बेस्ट लोकेशन आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलून येते.
माळशेज घाट हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य घाटमार्ग आहे, जो मुंबईपासून ईशान्येला सुमारे १३० किमी आणि पुण्यापासून उत्तरेकडे १२० किमी अंतरावर स्थित आहे.
माळशेज घाट धुक्याने वेढलेली शिखरे आणि कोसळणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता. पांढरे शुभ्र फेसाळलेले धबधबे पाहून तुम्ही निसर्गाच्या प्रेमात पडाल.
माळशेज घाटाकडे जाताना डोंगरातून तुम्हाला सुंदर धबधबे पाहायला मिळतील. यात माळशेज धबधबा, कालू धबधबा , रिव्हर्स वॉटरफॉल, तीन धारेचा धबधबा यांचा समावेश आहे.
माळशेज घाट हा पक्षी निरीक्षकांसाठी एक उत्तम परिसर आहे. येथील मुख्य आकर्षण पिंपळगाव जोगा धरण आहे. येथे फ्लॅमिंगो , क्रौंच, विविध प्रकारची बदके आणि पाणकोंबड्या स्थलांतर करून येतात.
माळशेज घाटाच्या आसपास पिंपळगाव जोगा धरण, हरिश्चंद्रगड किल्ला, काळू धबधबा, शिवनेरी किल्ला आणि नाणेघाट ही पर्यटन स्थळे आहेत.
माळशेज घाटामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही गोष्टी अत्यंत नयनरम्य दिसतात. डोंगराळ आणि उंच भागात वसलेला हा घाट दोन्ही विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
NEXT : चित्रकूट नावाने ओळखला जायचा 'हा' प्रसिद्ध किल्ला, सुंदर ऐतिहासिक ठिकाण पाहायला परदेशी पर्यटकांची गर्दी