Shreya Maskar
चित्तोडगड किल्ला (चित्तोड किल्ला) हा भारतातील राजस्थानच्या दक्षिण भागातील चित्तोडगड शहरात वसलेला आहे. आसपासच्या मैदानी प्रदेशापासून १८० मीटर उंचीवर उभा आहे.
चित्तोडगड किल्ला मेवाड प्रदेशात बेराच आणि गंभीरी नद्यांजवळ वसलेला असून, उदयपूरपासून ईशान्य दिशेला साधारणपणे ११२ किमी अंतरावर आहे. हा किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हा किल्ला मेवाडची राजधानी होता.
चित्तोडगड हे मूळतः 'चित्रकूट' किंवा 'चित्रकूटा' या नावाने ओळखले जात असे. हे नाव मौर्य राजा 'चित्रंगद मोरी' याच्या नावावरून पडले होते, ज्याने या किल्ल्याची सुरुवातीची उभारणी केली होती असे मानले जाते. कालांतराने त्याचे नाव बदलून 'चित्तोडगड' असे झाले.
चित्तोडगड हे नाव दोन शब्दांपासून बनले आहे. ('चित्र' आणि 'गड') चित्र याचा अर्थ 'रमणीय' असा होऊ शकतो, जो तेथील आकर्षक भूदृश्य दर्शवतो. गड म्हणजे 'किल्ला', 'राजवाडा' होय.
अल्लाउद्दीन खिलजीने १३०३ मध्ये चित्तोडगड किल्ल्यावर आक्रमण केले होते. दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने मेवाडचा राजा रत्नसिंह याच्याविरुद्ध हे आक्रमण केले होते.
'सरोवरांचे शहर' असलेले उदयपूर हे राजस्थानी इतिहासाचा एक अमूल्य ठेवा आहे. येथे गेल्यावर सिटी पॅलेस, बागोर की हवेली, सज्जनगड मॉन्सून पॅलेस ही ठिकाणे नक्की फिरा.
पावसाळ्यात चित्तोडगड किल्ल्याला फॅमिली, मित्रांसोबत नक्की भेट द्या. येथील सौंदर्य पावसाळ्यात खुलून येते. तुमचा ट्रेनने प्रवास सुखकर आणि कमी खर्चात होईल.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.