Shreya Maskar
महाराष्ट्राचे 'आंब्याचे शहर' म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी हा कोकण प्रदेशातील एक निसर्गरम्य किनारपट्टीचा जिल्हा आहे. पावसाळ्यात कोकण म्हणजे जणू स्वर्गच त्यामुळे येथे नक्की भेट द्या.
चंद्रनगर धबधबा रत्नागिरी दापोली जवळ वसलेला आहे. हे लोकप्रिय पावसाळी पर्यटन स्थळ आहे. तुम्ही येथे फॅमिलीसोबत वन डे ट्रिपचा प्लान करू शकता.
चंद्रनगर धबधबा सुप्रसिद्ध लाडघर समुद्रकिनाऱ्यापासून अंदाजे ५ ते ७ किलोमीटर अंतरावर, तर दापोलीच्या मुख्य केंद्रापासून सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरावर आहे.
कोकणातील मुसळधार पावसाळ्याच्या दिवसांत येथील नैसर्गिक सौंदर्य, हिरवीगार वनराई आणि स्वच्छ वाटा हे सर्व पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करते.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत चंद्रनगर धबधब्याला भेट देण्यासाठी बेस्ट आहे. जेव्हा पाऊस जोरात बरसत असतो, तेव्हा या धबधब्याचे सौंदर्य शिखरावर पोहचते. डोंगराळ भागातून कोसळणारा हा धबधबा दुधासारख्या शुभ्र प्रवाहाचे रूप धारण करतो.
लाडघर हे दापोलीजवळ वसलेले एक किनारपट्टीवरील गाव आहे, जे प्रामुख्याने पावसाळ्यात बहरून येणाऱ्या धबधब्यांसाठी ओळखले जाते. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद देखील घेऊ शकता.
दापोली येथे स्वच्छ समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक सागरी किल्ले आहेत. जलक्रीडांसाठी मुरुड बीच, डॉल्फिन पाहण्यासाठी लाडघर बीच, इतिहासाच्या अभ्यासासाठी सुवर्णदुर्ग किल्ला आणि शांत व प्रसन्न केशवराज मंदिर ही येथील आवर्जून भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.