Ratnagiri : कोकणची शान! तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला 'हा' किल्ला जपतोय इतिहासाचा अनमोल ठेवा

Shreya Maskar

रत्नागिरी - कोकण

कोकणात रत्नागिरी किल्ला वसलेला आहे. रत्नागिरी किल्ला ज्याला 'रत्नदुर्ग' किंवा 'भगवती किल्ला' म्हणूनही ओळखले जाते, हा महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे.

Ratnagiri – Konkan | google

रत्नागिरी किल्ला

रत्नागिरी किल्ला शहराच्या मुख्य केंद्रापासून सुमारे ४-५ किलोमीटर अंतरावर स्थित असून, त्याच्या आवारात अत्यंत पूजनीय असे 'भगवती देवी मंदिर' आहे. येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येते.

Ratnagiri Fort | google

अरबी समुद्र

रत्नागिरी किल्ला कोकण किनारपट्टीवरील १६ व्या शतकातील एक प्रमुख जलदुर्ग आहे. तीनही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला असून किल्ल्यावर एक प्रसिद्ध दीपगृह आहे.

The Arabian Sea | google

किल्ला कोणा बांधला?

रत्नागिरी किल्लाचे मूळ बांधकाम १२ व्या शतकात शिलाहार वंशाचा राजा भोज याने केले होते. १६७० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि मराठा साम्राज्याच्या गरजेनुसार त्याची तटबंदी बळकट करून तो अधिक मजबूत केला.

Who Built the Fort? | google

किल्ला का बांधला?

मूळतः कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आणि या प्रदेशातील सागरी व्यापाराला सुरक्षा पुरवण्यासाठी उभारण्यात आला होता. समुद्री लुटारूंवर कडक पाळत ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग केला जात असे.

Why Was the Fort Built? | google

किल्ल्याचा आकार

अरबी समुद्रात आतपर्यंत घुसलेल्या घोड्याच्या नालेसारख्या आकाराच्या भूशिरावर वसलेला हा किल्ला एक अत्यंत महत्त्वाचा नौदल तळ म्हणून कार्यरत होता.

Shape | google

कसं जाल?

रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरून पुढे रिक्षाने किंवा एसटीने तुम्ही किल्ल्याच्याजवळ पोहचू शकता. १५-२० मिनिटांचा हा रस्ता आहे.

How ​​to Get There? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला तुम्ही पाहिलाय का? अनेक पर्यटकांच्या नजरेआड आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Pune Fort | saam tv
येथे क्लिक करा...