Shreya Maskar
पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ मल्हारगड किल्ला वसलेला आहे. मल्हारगड किल्ला सोनोरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. मल्हारगड हे इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे.
मल्हारगड हा मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला मानला जातो. मल्हारगड ट्रेकिंगसाठीही उत्तम ठिकाण आहे. सोनोरी गावातून ट्रेकिंगची वाट सुरू होते.
मल्हारगड १७५७ ते १७६० या काळात बांधण्यात आला. याची उभारणी पेशवे सरदार कृष्णाजी माधवराव पानसे आणि भिवराव यशवंत पानसे यांनी केली होती; हे सरदार मराठा तोफखान्याचे प्रमुख होते.
पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी, एक मोक्याची जागा म्हणून मराठा साम्राज्याने मल्हारगड किल्ल्याची उभारणी केली होती.
मल्हारगड किल्ल्यावर दोन मंदिरे आहेत. एक भगवान शंकराला समर्पित आहे. तर दुसरे खंडोबा देवाचे आहे. येथे शांत वातावरण अनुभवायला मिळते.
मल्हारगड किल्ल्याच्या नावाचा इतिहास भगवान मल्हारी (भगवान शंकराचा अवतार- 'भगवान खंडोबा') यांच्या नावावरून ठेवण्यात आले असल्याचे बोले जाते.स्थानिक लोक याला अनेकदा 'सोनोरी किल्ला' म्हणतात, कारण किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या 'सोनोरी' गावातून वाट जाते.
मुंबईहून पुणे रेल्वे स्टेशनला उतरा. त्यानंतर पुढे रिक्षा किंवा बसने तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचला. मित्रांसोबत येथे नक्की जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.