Vasai-Virar Tourism : रिमझिम पावसात समुद्रकिनारी चिंब भिजा, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसईत लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Shreya Maskar

वसई-विरार

भुईगाव बीच हा महाराष्ट्रातील वसई येथे वसलेला एक शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. हे ठिकाण नयनरम्य सूर्यास्त आणि प्री-वेडिंग फोटोशूट्ससाठी अत्यंत लोकप्रिय आहे.

Vasai | google

कसं जाल?

विरार गाडी पकडून तुम्ही वसईला उतरा. त्यानंतर पश्चिम दिशेला जा. स्टेशन बाहेर आल्यावर रिक्षाने तुम्ही भुईगाव बीचपर्यंत पोहचू शकता.

train | google

भुईगाव बीच

भुईगाव बीच काळ्या वाळूचा एक शांत आणि रमणीय किनारा आहे. अरबी समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. तसेच हा किनारा हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे.

Bhuigaon Beach | google

फोटोशूट

तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट, प्री-वेडिंग फोटोशूट आणि व्हिडीओ शूट करायचे असेल तर हे लोकेशन बेस्ट आहे. येथे वीकेंडला गर्दी पाहायला मिळते. मावळणाऱ्या सूर्यासोबत येथे सुंदर फोटो क्लिक करता येतात.

Photoshoots | pinterest

गोव्याचा फील

भुईगाव बीच घनदाट झाडी (सुरू, नारळी-सुपारीची झाडे) आणि पश्चिमेला अथांग अरबी समुद्राने वेढलेला आहे. हा बीच पर्यटकांना कोकणासारखा किंवा 'मिनी गोवा' सारखा अनुभव देतो.

A 'Goa' Vibe | google

कधी भेट द्यावी?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भुईगाव बीचला भेट द्या. तसेच तुम्ही येथे संध्याकाळी निवांत फेरफटका मारायला जा. तुम्हाला थंडगार वारा स्पर्श करेल. तसेच येथे तुम्हाला घोडेस्वारीचा आनंद घेता येतो.

When to Visit? | google

वसई-विरारमधील इतर बीच

वसई-विरारमध्ये अनेक समुद्रकिनारे पाहायला मिळतात. यात सुरुची बीच, नवापूर बीच, राजोडी बीच, कळंब बीच, बेना बीच यांचा समावेश आहे.

Rajodi Beach | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : नांदेडचा अभिमान! पराक्रम, इतिहास अन् कलेचा साक्षीदार, सुट्ट्यांमध्ये करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Nanded Tourism | saam tv
येथे क्लिक करा...