Nanded Tourism : नांदेडचा अभिमान! पराक्रम, इतिहास अन् कलेचा साक्षीदार, सुट्ट्यांमध्ये करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Shreya Maskar

फॅमिली ट्रिप

गोदावरी नदीच्या काठावर नांदेड वसलेले आहे. सुट्ट्यांमध्ये तुम्ही येथे फॅमिली ट्रिप प्लान करू शकता. येथे एक ऐतिहासिक किल्ला लपलेला आहे.

Family Trip | pinterest

नांदेड

कंधार किल्ला हा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार या तालुक्याच्या गावी वसलेला एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. सुट्टीत येथे नक्की फिरायला जा.

Nanded | google

कंधार किल्ला

कंधार किल्ला मूळतः १० व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण (तिसरा) याने उभारला होता. सुरुवातीला हा किल्ला मातीचा वापर करून बांधण्यात आला असला, तरी त्यानंतरच्या राजवंशांनी पुढे जड काळ्या दगडांचा वापर करून त्याची पुनर्बांधणी व विस्तार केला.

Kandhar Fort | google

राष्ट्रकूट साम्राज्याची राजधानी

कंधार किल्ला १,००० वर्षे जुना वास्तुशिल्पाचा एक अद्भुत नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. कंधार किल्ला बलाढ्य राष्ट्रकूट साम्राज्याची राजधानी होता. कंधार किल्ला हा एके काळी बलाढ्य राष्ट्रकूट साम्राज्याची राजधानी (उपराजधानी) आणि एक महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र होता.

Capital of the Rashtrakuta Empire | google

किल्ल्याची रचना

१०० फूट रुंद असलेला संरक्षणात्मक खंदक, अष्टधातूची बनलेली प्रचंड 'अंबारी' तोफ आणि 'शीश महाला'चे (काचेच्या महालाचे) अवशेष किल्ल्यावर पाहायला मिळतात. किल्ल्याच्या रचनेमुळे ऐतिहासिक काळात शत्रूंना किल्ल्यात प्रवेश करणे जवळजवळ अशक्य झाले होते.

The Fort's Architecture | google

ऐतिहासिक वास्तुकला

कंधार किल्ल्यामध्ये इंडो-इस्लामिक आणि मराठा शैलींचा सुरेख संगम पाहायला मिळतो. येथील लाल महाल, दरबार महाल, अंबर खाना, तसेच भव्य जिन्सी आणि माचली दरवाजे ही येथील प्रमुख वास्तू-लक्षणे आहेत.

Historical Architecture | google

नांदेड पिकनिक स्पॉट

नांदेड येथे सहस्रकुंड धबधबा, विष्णुपुरी धरण, नांदेड किल्ला, माता गुजरी जी विसावा बाग ही पर्यटन स्थळे आहेत.

Waterfall | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

fort | google

NEXT : कोकण कड्याची भव्यता अन् सह्याद्रीतील थरार; करा 'या' ऐतिहासिक किल्ल्याचा रोमांचक प्रवास

Ahilyanagar Tourism | google
येथे क्लिक करा...