Dombivli : तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल...; महिलेने भीतीने लिंकवर क्लिक केलं, सेकंदात बँक खात्यातून ३ लाख उडाले

Dombivli Gas Cylinder Shortage Fraud : डोंबिवलीत गॅस बिल अपडेट न केल्यास कनेक्शन बंद होईल असा बनावट मेसेज पाठवून सायबर भामट्यांनी एका महिलेची जवळपास 3 लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Dombivli : तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल...; महिलेने भीतीने लिंकवर क्लिक केलं, सेकंदात बँक खात्यातून ३ लाख उडाले
Dombivli Gas Cylinder Shortage FraudAI
Published On
Summary
  • डोंबिवलीत गॅस बिल अपडेटच्या नावाखाली सायबर फसवणूक

  • बनावट एसएमएस आणि लिंकद्वारे महिलेची कार्ड माहिती घेतली

  • क्रेडिट आणि डेबिट कार्डमधून जवळपास ३ लाख रुपये लंपास

  • पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पुढील तपास सुरू.

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

Dombivli Gas Cylinder Shortage Cyber Scam एकीकडे दोन आठवड्यांपासून जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे भारतात गॅस पुरवठा कमी झाल्याच्या बातम्यांनी नागरिक आधीच चिंतेत आहेत. याच चिंतेचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी संधी साधून अनेकांचे खिसे कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे . डोंबिवलीतील एका नोकरदार महिलेला गॅस कनेक्शन कापले जाईल अशी भीती दाखवून, तब्बल २ लाख ९९ हजार ५०० रुपयांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या स्मिता राणे या नोकरदार महिलेच्या पतीला गेल्या आठवड्यात एक एसएमएस आला. तुम्ही भरलेले महानगर गॅसचे देयक आमच्याकडे दिसत नाहीये, त्वरित अपडेट न केल्यास गॅस जोडणी बंद होईल,असा इशारा या मेसेजमध्ये होता. गॅसचा तुटवडा आधीच असल्याने भीतीपोटी स्मिता यांनी संदेशातील नंबरवर संपर्क साधला.

Dombivli : तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल...; महिलेने भीतीने लिंकवर क्लिक केलं, सेकंदात बँक खात्यातून ३ लाख उडाले
Accident News : धावत्या स्कूल बसमधून पडली, चाकाखाली चिरडून ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

भामट्याने स्मिता यांना विश्वासात घेऊन सांगितले की, तांत्रिक कारणास्तव त्यांचे बिल दिसत नाहीये आणि त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करावी लागेल. बोलता बोलता सायबर चोराने स्मिता यांना एक लिंक पाठवली. ती उघडल्यानंतर स्मिता यांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती भरली. त्या नंतर प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे भासवून भामट्याने त्यांना फोनवर गुंतवून ठेवले. त्याच वेळी त्यांच्या क्रेडिट कार्डमधून २ लाख आणि डेबिट कार्डमधून ९९ हजार ५०० रुपये असे एकूण ३ लाख रुपये लंपास केले.​

Dombivli : तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल...; महिलेने भीतीने लिंकवर क्लिक केलं, सेकंदात बँक खात्यातून ३ लाख उडाले
Nashik : नाशिक हादरले! पोलिस असल्याचे सांगत व्यापाऱ्याचे अपहरण, २५ लाखांची खंडणीची मागणी; छळादरम्यान दुर्दैवी मृत्यू

बँकेचे मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे स्मिता राणे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे.​ आतापर्यंत गुंतवणुकीच्या नावाखाली लुटणारे भामटे आता थेट गॅस जोडणीच्या नावाने फसवणूक करू लागल्याने ग्राहकांमध्ये भीती पसरली आहे. इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली नागरिक आधीच आक्रमक असताना अशा सायबर हल्ल्यांमुळे खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com