DJ Controversy: उद्धव ठाकरेंचा डीजेला विरोध, विद्यानंद बापट यांच्यावरून थेट सरकारला सुनावले खडेबोल

Uddhav Thackeray On DJ Controversy: डीजेच्या मुद्द्यावरून आता राजकारण देखील चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी डीजेला विरोध करत थेट सरकारवर निशाणा साधला.
DJ Controversy: उद्धव ठाकरेंचा डीजेला विरोध, विद्यानंद बापट यांच्यावरून थेट सरकारला सुनावले खडेबोल
DJ ControversySaam Tv
Published On
  • गणेशोत्सवातील डीजेला उद्धव ठाकरेंचा विरोध

  • डीजे बंदीवर उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले

  • विद्यानंद बापट हल्ला प्रकरणावर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

  • पारंपरिक वाद्य असताना डीजेची गरज आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल

राज्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेला विरोध केला जात आहे. पुण्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये डीजे बंदीबाबत निर्णय घेतला जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत डीजेच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. 'पारंपरिक वाद्य असताना डीजे ची गरज आहे का?', असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी देखील डीजेला विरोध केला आहे. पुण्यामध्ये डीजेला बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. याच डीजेच्या मुद्द्यावरून राज्यभरात वातावरण तापले आहे.

डीजे बंदीविरोधात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'मी उघड भूमिका घ्यायला तयार आहे. गणेशोत्सव मंडळांशी सरकार चर्चा का करत नाही? मी गणेशोत्सव मंडळांसोबत तेव्हा चर्चा करत होतो. पारंपरिक वाद्य असताना डीजेची गरज आहे का?सणाचे पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. सणात गोंगाट असणं गरजेचं नाही. लोकमान्यांनी सणाची चळवळ केली. उत्सवाचे रूपांतर गोंगाटात होऊ नये.'

DJ Controversy: उद्धव ठाकरेंचा डीजेला विरोध, विद्यानंद बापट यांच्यावरून थेट सरकारला सुनावले खडेबोल
Maharashtra Politics: शरद पवारांच्या जवळच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, 'ते' वक्तव्य भोवलं; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

उद्धव ठाकरे यांनी विद्यानंद बापट यांच्यामुद्द्यावर बोलताना थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री यांच्याकडे गृहखाते येतं. आयुक्तांची एकत्रित बैठक करून एकवाक्यता करा ना. जो प्रश्न उचलतो त्याला रात्री उचलतात तुम्ही. या सर्वांशी चर्चा करा ना. संतोष पंडीत, विद्यानंद बापट यांच्याशी तुम्ही चर्चा करा ना.'

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला. ते म्हणाले की, 'या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. CJP च्या आंदोलनाला सर्वात आधी उघडपणे राजकीय पक्षाने कोणत्या पाठिंबा दिला असेल तर तो शिवसेना पक्ष आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे पण राजीनामा कोणाचा मागायचा? जे आमदार फुटले आणि गुवाहाटीला गेले त्यांचा.'

DJ Controversy: उद्धव ठाकरेंचा डीजेला विरोध, विद्यानंद बापट यांच्यावरून थेट सरकारला सुनावले खडेबोल
Maharashtra Politics: रायगडमध्ये मोठा राजकीय भूकंप! तटकरेंनी ठाकरेंचा जवळचा नेता फोडला, पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश

एमपीएससी पेपरफुटीवरून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. त्यांनी असे सांगितले की, 'पोरांचे पेपर फुटले हे कुठे जाणार जे स्वतः फुटले त्यांना पेपर फुटल्याचे काय समजणार? सरकारी नोकऱ्यांसाठी हा पेपर होता आणि तो पेपर फुटला. पेपर फुटल्यानंतर जे पास होतील ते काय शासन चालवतील. या आमदारांना पेपर फुटतोय याचा काही फरक पडत नाही. कोणी आमदार- खासदार फुटतोय का हे बघत असतात.', असे म्हणत ठाकरेंनी सरकारच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली.

DJ Controversy: उद्धव ठाकरेंचा डीजेला विरोध, विद्यानंद बापट यांच्यावरून थेट सरकारला सुनावले खडेबोल
Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com