Dadar Railway Station Threat call : दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी; मध्यरात्री धमकीचा फोन

Dadar Railway Station Threat call from virar : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. दादर रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मध्यरात्री ११२ या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला होता.
threat call
threat callSaam TV

सचिन गाड, मुंबई

Dadar railway Station threats call News:

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. दादर रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मध्यरात्री ११२ या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी वसईच्या पेल्हार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्वात जास्त प्रवाशांची वर्दळ असलेल्या दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मध्यरात्री ११२ हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला होता. विकास शुक्ला नावाच्या व्यक्तीने कॉल करून धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर वसईच्या पेल्हार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.

threat call
Nagpur Crime: नागपूर पोलिसांची मोठी कारवाई! चोरीच्या प्रकरणात चौघांना अटक; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांच्या हेल्पलाईनला कॉल येताच यंत्रणा सतर्क झाली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी दादर रेल्वे स्थानकाची तपासणी केली. मात्र, या पथकाला दादर रेल्वे स्टेशनवर काहीही संशयास्पद आढळलं नाही.

threat call
Dhule Crime News : मध्य प्रदेशातून मुंबईत येत होती कार, धुळे पोलिसांना फक्त संशय आला, धक्कादायक बाब आली समोर

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांच्या ११२ हेल्पलाईनला कॉल आला होता. पोलिसांच्या हेल्पलाईनच्या नागपूर कार्यालयात रात्री १२ फोन आला. त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांना कळवलं. त्यानंतर दादर पोलीस, रेल्वे पोलीस,बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तात्काळ दादर रेल्वे स्टेशनची तपासणी केली. या तपासणीत काहीही संशयास्पद आढळलं नाही. आरोपीने कॉल करून लोकांना सतर्क करण्यासाठी कॉल केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com