CM फडणवीसांकडून DJ बंदीचे संकेत, नागरिकांना केलं मोठं आवाहन

CM Fadnavis Statement On DJ Ban in Pune During Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील डीजे वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले. डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन फडणवीसांनी पुणेकरांना केले.
CM Fadnavis statement on DJ ban in Pune during Ganeshotsav 2026
CM Fadnavis statement on DJ ban in Pune during Ganeshotsav 2026saam tv
Published On

आगामी गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या डीजेवादावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच भाष्य केल आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे साऊंड असोसियशन आणि प्रशासनात वाद सुरू असून यावर कुठलाही अंतिम निर्णय होत नाहीये. याच ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी पुणेकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणेकरांनी डीजेच्या वादात न पडता, सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा असे फडणवीस यांनी म्हंटलं आहे. पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकरणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांना आवाहन केले.

गणपती उत्सवात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या वापरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. डीजेमुळे लहान मूलं, वृद्ध आणि हृदयविकाराच्या लोकांना होणारा त्रास टाळण्यासाठी डीजेवर बंदी घातली जावी अशी मागणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं आवाहन केलं. मी जेव्हा या कार्यक्रमातून बाहेर पडेल तेव्हा पत्रकार मला पुण्यासंदर्भात एकच प्रश्न विचारणार आहे.

CM Fadnavis statement on DJ ban in Pune during Ganeshotsav 2026
आवाज कमी करा, मोठा करा पण एकदा काय ते ठरवा! पुणे महापालिकेतील गणेश मंडळाच्या बैठकीत काय घडलं?

तुम्ही गणपती उत्सवाचं बोललात मग गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही? हा प्रश्न मला नक्की विचारला जाणार आहे. पण मी पुणेकरांना सांगू इच्छितो. पुण्यामध्येच ही क्षमता आहे. की संपूर्ण उत्सव सांस्कृतिक पद्धतीनं केला पाहिजे. हे फक्त पुणेकरच करू शकतात. माझं पुणेकरांना आवाहन आहे, डीजेच्या वादात न पडता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की गणपती उत्सव सांस्कृतिक पद्धतीने कसा साजरा होतो? असं यावेळी CM फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com