Central Railway : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्द; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Central Railway News : कसारा-आसनगावदरम्यान ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान रेल्वे ब्लॉक. अनेक लोकल फेऱ्या रद्द असून प्रवाशांसाठी ६ जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Central Railway Kasara Block Local Trains Cancelled & Extra Buses
Central Railway Kasara Block Local Trains Cancelled & Extra BusesAI image
Published On: 
Summary
  • ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान कसारा-आसनगावदरम्यान दररोज ५ तासांचा रेल्वे ब्लॉक

  • ब्लॉकच्या काळात लोकल सेवा आसनगावपर्यंतच चालवण्यात येणार

  • कसारा मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द

  • प्रवाशांसाठी शहापूर बस आगाराकडून ६ जादा बसगाड्या चालवण्यात येणार

प्रवाशांनो तुम्ही जर ७ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेवरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. मध्य रेल्वेने तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी कसारा-आसनगावदरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या कालावधीत कसारातील लोकल रेल्वे सेवेवर मोठा परिणाम होणार असून, प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

१२ दिवस ब्लॉक

ब्लॉकच्या काळात लोकल सेवा आसनगाव स्टेशनपर्यंतच चालवण्यात येणार आहे. त्यामुळे कसारा, खर्डी, उंबरमाळी, आटगाव आणि परिसरातील प्रवाशांना प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शहापूर बस आगाराने कल्याण-कसारा मार्गावर ६ जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा बसेस ७ ते १८ ऑक्टोबर या १२ दिवसांमध्ये दररोज दुपारी २.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत धावणार आहेत. कसारा-शहापूर-कल्याण या मार्गावर या बससेवेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे.

Central Railway Kasara Block Local Trains Cancelled & Extra Buses
Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

जादा बसगाड्या सोडणार

या जादा बसगाड्या खर्डी, उंबरमाळी, आटगाव, लाहे आणि आसनगाव या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाल्यानंतर प्रवाशांना आपल्या पुढील प्रवासासाठी या बससेवेचा उपयोग करता येणार आहे. प्रवाशांनी रेल्वे ब्लॉकच्या कालावधीत उपलब्ध करण्यात आलेल्या या पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बस आगार प्रमुखांनी केले आहे.

Central Railway Kasara Block Local Trains Cancelled & Extra Buses
Lemon Juice Tricks : कितीही पिळला तरी लिंबातून कमी रस मिळतो? घरच्या घरी 'या' 6 सोप्या ट्रिक्स करून पाहा

महत्त्वाच्या लोकल फेऱ्या रद्द

दरम्यान, या ब्लॉकमुळे कसारा मार्गावरील काही महत्त्वाच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. दुपारी 3.35 वाजताची N-24, 4.16 वाजताची N-26, 5.02 वाजताची N-28 आणि 6.16 वाजताची N-30 या चार लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. तसेच दुपारी 2.45 वाजल्यानंतर ते रात्री 8.35 वाजेपर्यंत कसारा येथून मुंबईच्या दिशेने एकही लोकल ट्रेन धावणार नाही. त्यामुळे या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रेल्वेचे वेळापत्रक तपासून घराबाहेर पडावे आणि शक्य असल्यास पर्यायी बससेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेच्या तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे हा ब्लॉक घेण्यात येत असून, काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीला त्याचा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com