Thane News : शिंदे - ठाकरे गट राड्या प्रकरणी 'या' कार्यकर्त्यांसह चाळीस जणांवर गुन्हा दाखल

साेमवारी रात्री झाला हाेता राडा.
thane, eknath shinde, uddhav thackeray
thane, eknath shinde, uddhav thackeraysaam tv

Thane News : ठाण्यातील किसन नगर भागात शिंदे ठाकरे गटात झालेल्या मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दाेन्ही गटातील प्रमुख नेत्यांसह सुमारे चाळीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. (thane latest marathi news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या मतदार संघात रात्री दोन्ही गटात राडा झाला. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (rajan vichare) यांच्या समोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. तर शिंदे गटाने देखील त्यांना प्रत्युत्तर दिले. (Maharashtra News)

thane, eknath shinde, uddhav thackeray
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; ट्रकचा चक्काचूर, नागपूरच्या बस चालकासह तिघे जखमी

या राड्या प्रकरणी पाेलिसांनी शिंदे गटाचे (eknath shinde) माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्यासह दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर तसेच ठाकरे गटाचे (uddhav thackeray) दीपक साळवींसह तीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शिंदे गटाकडून धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे, गळ्यातील साखळी हिसकावणे, मुखमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणे, बदनामीकारक घोषणा देऊन जनमानसात बदनामी होईल असे कृत्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली हाेती.

thane, eknath shinde, uddhav thackeray
Love Jihad : हिंदू मुलींना पळवून नेण्यासाठी पैसे दिले जातात ? अबू आजमी म्हणाले...

उद्धव ठाकरे गटाचे दिपक साळवी यांनी दिलेल्या तक्रारीनूसार मारहाण करणे, साखळी हिसकाविणे या तक्रारीनूसार पाेलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

thane, eknath shinde, uddhav thackeray
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Final Result : 'भीमा' त पुन्हा 'मुन्नाराज'; जाणून घ्या सर्व निकाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com