Pune : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! भाजपचे १२६ नगरसेवक देणार एक वर्षाचे मानधन

Pune News : पुणे महापालिकेतील भाजपच्या १२६ नगरसेवकांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक वर्षाचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Drought News
Maharashtra Drought News AI Image
Published On: 

दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुणे महापालिकेतील भाजपच्या १२६ नगरसेवकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक वर्षाचे मानधन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ही आर्थिक मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत शुक्रवारी या संदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना या कठीण परिस्थितीत आधार मिळावा, या उद्देशाने भाजपच्या नगरसेवकांनी आपले एक वर्षाचे मानधन देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Drought News
Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

या निर्णयाबाबत बोलताना धीरज घाटे यांनी महापालिकेतील सर्व नगरसेवकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणे अपेक्षित होते, असे म्हटले. शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून, तो सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे सभागृहातील सर्व नगरसेवकांनी या उपक्रमात सहभागी होऊन मदतीचा हात पुढे करायला हवा होता, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, भाजपच्या नगरसेवकांव्यतिरिक्त इतर नगरसेवकांनी या प्रस्तावात सहभाग घेतला नसल्याचे घाटे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वपक्षीय एकजूट दिसून यायला हवी होती, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Maharashtra Drought News
Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून नगरसेवकांचे एक वर्षाचे मानधन संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. येणाऱ्या दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वासही धीरज घाटे यांनी व्यक्त केला. दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी विविध स्तरांवर मदतीची गरज असताना पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवकांच्या या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. या मदतीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कितपत दिलासा मिळतो आणि प्रत्यक्ष मदत कधीपर्यंत पोहोचते, याकडे आता लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com