मान्सून परतीच्या मार्गावर असतानाच हवामानात मोठा बदल पाहायला मिळतं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या, १९ ऑक्टोबर रोजी देशातील ९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आल्याची माहिती आहे. या काळात ताशी ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित राज्यांतील नागरिकांनी हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या नऊ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत ताशी ८० किलोमीटरपर्यंत वाऱ्यांचा वेग जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
विशेषतः पश्चिम बंगाल आणि ओडिशासह छत्तीसगडमधील काही भागांत जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एकीकडे देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा असताना, राजधानी दिल्लीमध्ये मात्र सध्या पावसाची शक्यता नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे दिल्लीकरांना पावसाच्या दृष्टीने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड आणि राजस्थानमधील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः उंचावरील भागांत हवामानात बदल होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.