मुंबईत ‘नालेसफाई’ घोटाळा? रात्री टाकला कचरा, सकाळी काढली बिलं

BMC Contractor Fake Billing Nala Safai Case: बोरिवली परिसरात नालेसफाईच्या नावाखाली मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे. कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतातून बनावट बिलं काढल्याचा संशय व्यक्त केला जात असून आमदार संजय उपाध्याय यांनी चौकशीची मागणी केली आहे.
Debris allegedly dumped into drains in Borivali to fake cleaning work, sparking corruption allegations against contractors and civic officials.
Debris allegedly dumped into drains in Borivali to fake cleaning work, sparking corruption allegations against contractors and civic officials.Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई उपनगरातील बोरिवली (पश्चिम) परिसरात नालेसफाईच्या कामांमध्ये मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप समोर आला आहे. पु.ल. देशपांडे गार्डन जवळ, लिंक व्ह्यू हॉटेल समोर, लिंक रोड, नवीन एमएचबी कॉलनी आणि गोराई रोड परिसरात हा प्रकार घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. कंत्राटदार आणि महापालिकेच्या आर सेंट्रल कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने रात्रीच्या वेळेस या ठिकाणी रस्त्यावरील दगड फेवर ब्लॉक डिव्हायडरचे दगड अशा प्रकारचा राडाराडा आणून नाल्यात टाकला जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

यानंतर आमदार संजय उपाध्याय यांनी देखील पालिका अधिकाऱ्या ंस समवेत या ठिकाणी पाहणी करून सदर प्रकार गंभीर असून याच्या चौकशीची मागणी करत पालिकेचे कोण कोण अधिकारी यात सहभागी आहे यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

Debris allegedly dumped into drains in Borivali to fake cleaning work, sparking corruption allegations against contractors and civic officials.
#shorts : Free travel : भाक्रा-नांगल ट्रेनने करू शकता फ्री प्रवास..

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेकडील गोराई रोड परिसरात असलेल्या माल्यामध्ये रात्रीच्या वेळी बाहेरून दगड, माती आणि डेब्रिज नाल्यात टाकले जाते. त्यानंतर सकाळी त्याच कचऱ्याला “नालेसफाई” म्हणून दाखवून कंत्राटदारांकडून बिलं काढली जातात. या प्रकारात महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, “नालेसफाई”च्या नावाखाली प्रत्यक्षात पालिकेची तिजोरी साफ करण्याचा प्रकार सुरू असून, जनतेच्या कराच्या पैशावर उघडपणे डाका टाकला जात आहे. या प्रकारामुळे खरी नालेसफाई न होता पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका अधिक वाढणार आहे.

Debris allegedly dumped into drains in Borivali to fake cleaning work, sparking corruption allegations against contractors and civic officials.
Mumbai Crime: मुंबईत पोलिसावर हल्ला, मद्यधुंद तरुणाने आधी शिवीगाळ केली नंतर...

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन पारदर्शक पद्धतीने नालेसफाईची कामे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी देखील पालिका अधिकाऱ्यांसमवेत नाल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना देखील या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दगड गोटे असल्याचे दिसून आले. पालिका अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता नालेसफाई करताना जेसीबीमुळे नाल्याचा काही भाग खोदला गेला त्यातून दगड गोटे वर आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले मात्र उपाध्याय यांचे या उत्तराने समाधान न झाल्यामुळे त्यांनी अशाच प्रकारचे नाला खोदण्याचे काम पुढील भागात करण्यास सांगितले असता पालिका अधिकारी तयार झाले नसल्याचेही उपाध्याय त्यांनी म्हटले आहे.

या सर्व प्रकारांमध्ये मोठा गौडबंगाल असल्याचेही उपाध्याय त्यांचा आरोप असून जनतेच्या पैशाचा अपव्यय खपवून घेतला जाणार नाही. यात जे कंत्राटदार किंवा पालिकेचे अधिकारी दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील उपाध्याय यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com