BMC News : तरुणांना BMCमध्ये थेट कामाची संधी; १२ महिन्यांची Fellowship, अर्जाची प्रक्रिया काय?

BMC Gen Z Fellowship Programअंतर्गत २८ वर्षांखालील पदवीधर तरुणांना मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सहभागी होता येणार आहे. १२ महिन्यांच्या या Fellowshipसाठी ५० जागा उपलब्ध असून, धोरणनिर्मिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा अनुभव तरुणांना मिळणार आहे.
BMC News : तरुणांना BMCमध्ये थेट कामाची संधी; १२ महिन्यांची Fellowship, अर्जाची प्रक्रिया काय?
BMC News : तरुणांना BMCमध्ये थेट कामाची संधी; १२ महिन्यांची Fellowship, अर्जाची प्रक्रिया काय?meta ai
Published On

गणेश कवडे

'Gen Z' पिढीला अराजकतेकडे नाही तर पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात विकासाच्या मार्गावर नेणार

Gen Z फेलोशिप प्रोग्राम' : मुंबई महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय - नगरसेवक सीए प्रतिक कर्पे

जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनानंतर देशभरात GEN Z चा मुद्द्याने जोर धरला आहे. हीच जेन झी भारताचे भाविष्य आहे. भारताची पुढील पीढी आहे. त्यामुळे यांना योग्य मार्गदर्शन आणि साथ देण्याचा विचार देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिकेने केला आहे. जेन झी तरूणांना मुंबईच्या विकासासाठी एकत्रित करण्यासाची संधी उपलब्ध करून देत BMC Gen Z Fellowship Program सुरू करण्यात येणार आहे.

काही तथाकथित युवा नेते 'Gen Z (नव्या पिढीला) अराजकतेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असताना, भारतीय जनता पक्षाचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आहे; तरुणांना केवळ प्रश्न विचारणारे न ठेवता, त्यांना देशाच्या आणि शहराच्या विकासातील प्रत्यक्ष भागीदार बनवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे, असा घणाघाती टोला भाजप नगरसेवक आणि मुंबई भाजप सचिव सीए प्रतिक कर्पे यांनी लगावला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत, महायुती सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रथमच ('BMC Gen Z Fellowship Program' ) ची अधिकृत घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या संकल्पनेतून ही योजना प्रत्यक्षात आणली गेली आहे.

BMC News : तरुणांना BMCमध्ये थेट कामाची संधी; १२ महिन्यांची Fellowship, अर्जाची प्रक्रिया काय?
Ajit Pawar: 'श्रीमद्भागवत' वाचली असती तर...; अजित पवारांच्या अपघाताबाबत इस्कॉन अध्यक्षांचं धक्कादायक वक्तव्य

या ऐतिहासिक फेलोशिप उपक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीतील तरुणांना सुशासनात थेट सहभाग घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. याअंतर्गत तरुणांना बीएमसीच्या प्रशासकीय कामकाजाचा, धोरणनिर्मितीचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेता येईल. या १२ महिन्यांच्या कालावधीच्या फेलोशिपसाठी एकूण ५० जागा उपलब्ध करण्यात आल्या असून, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रुपये ६१ हजार ५०० मानधन दिले जाणार आहे. २८ वर्षांपेक्षा कमी वय असलेले कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या योजनेसाठी पात्र असतील. तसेच, उमेदवाराला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संगणक हाताळणी येणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांना १९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत https://bmc.recruitlive.in/#/login या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येईल. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबई हे स्वप्न साकार करण्यासाठी ही फेलोशिप युवा पिढीला मोठे व्यासपीठ ठरवून देईल, असा विश्वास नगरसेवक प्रतिक कर्पे यांनी व्यक्त केला आहे.

BMC News : तरुणांना BMCमध्ये थेट कामाची संधी; १२ महिन्यांची Fellowship, अर्जाची प्रक्रिया काय?
Gold Rate Today : सोने - चांदीचे दर गगनाला भिडले! सोन्याचे भाव ४,३०० रुपयांनी वधारले; 24k,22k,18k चे ताजे दर वाचा
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com