Ajit Pawar: 'श्रीमद्भागवत' वाचली असती तर...; अजित पवारांच्या अपघाताबाबत इस्कॉन अध्यक्षांचं धक्कादायक वक्तव्य

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये अपघात झाला होता. त्यांचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले. ते बारामतीला सभेसाठी जात असताना ही घटना घडली होती.
Ajit Pawar: 'श्रीमद्भागवत' वाचली असती तर...; अजित पवारांच्या अपघाताबाबत इस्कॉन अध्यक्षांचं धक्कादायक वक्तव्य
ajit pawarSaam tv
Published On
  • अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत महत्वाची माहिती

  • ‘श्रीमद्भागवत वाचली असती तर अपघाती मृत्यू झाला नसता’ असा दावा त्यांनी केला

  • अजित पवारांना आषाढी एकादशीला श्रीमद्भागवत ग्रंथ भेट दिल्याचा दावा

  • अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांना धक्का बसला.

विकास मिरगणे, नवी मुंबई

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. श्रीमद्भागवत' वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. मागील आषाढी एकादशीला इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी 'श्रीमद्भागवत' ग्रंथ भेट म्हणून दिला होता. 'हा ग्रंथ तुम्ही नक्की वाचा', असा आग्रह त्यांनी अजित पवार यांच्याकडे धरला होता. मात्र अजित पवार यांनी हा ग्रंथ वाचला नसावा, असे सूरदासजी यांचे मानणे आहे.

इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 'श्रीमद्भागवत' ग्रंथाचे वाचन केल्याने माणसाचा अपघाती मृत्यू टळतो, अशी त्यांची तीव्र श्रद्धा आहे. त्यामुळेच अजित पवार यांच्यासोबत घडलेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. बारामतीजवळ त्यांचे विमान कोसळलं होतं. या अपघातामध्ये त्यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता.

Ajit Pawar: 'श्रीमद्भागवत' वाचली असती तर...; अजित पवारांच्या अपघाताबाबत इस्कॉन अध्यक्षांचं धक्कादायक वक्तव्य
Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

डॉ. सूरदासजी नेमकं काय म्हणाले ?

सर्वप्रथम म्हणजे तुम्ही ज्या कोणत्याही भाषेतून हे जाणून घेता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की, जो कोणी हा श्रीमद्भागवत) ग्रंथ संपूर्णपणे आपल्या आयुष्यात स्वीकारतो किंवा अमलात आणतो, त्याचा अपघाती (अकाली) मृत्यू होत नाही. मी गेल्या आषाढी एकादशीला स्वतःच्या हातांनी अजित पवारजींना हा ग्रंथ भेट दिला होता आणि त्यांना विनंती केली होती की कृपया हा ग्रंथ नक्की वाचा. पण मला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी तो वाचला नाही.

Ajit Pawar: 'श्रीमद्भागवत' वाचली असती तर...; अजित पवारांच्या अपघाताबाबत इस्कॉन अध्यक्षांचं धक्कादायक वक्तव्य
अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

त्यामुळे जे काही घडले ते चांगले झाले नाही. मी गेल्या आषाढी एकादशीला त्यांच्या दालनात (ऑफिसमध्ये) जाऊन त्यांना हा ग्रंथ भेट दिला होता. मी त्यांना वारंवार हेच सांगत होतो, कदाचित त्या दिवशी तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना आठवत असेल मी त्यांना सांगितले होते की 'कृपया हा ग्रंथ वाचा, नक्की वाचा... याला इतर कोणत्याही सामान्य पुस्तकासारखे समजू नका.'

Ajit Pawar: 'श्रीमद्भागवत' वाचली असती तर...; अजित पवारांच्या अपघाताबाबत इस्कॉन अध्यक्षांचं धक्कादायक वक्तव्य
Ajit Pawar Case: 'लहान भावाचा काटा काढण्यात मोठ्या भावाचा हात', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com