NAMO Maha Rojgar Melava : राज्य सरकारच्या कार्यक्रमात गणपत गायकवाड प्रमुख पाहुणे; ठाण्यातील 'नमो महारोजगार' मेळाव्याच्या पोस्टरवरुन वाद

Ganpat Gaikwad News : राज्य सरकारच्या नमो महारोजगार मेळाव्याचे ठाण्यात होत आहे. कोकण विभागामार्फत मॉडेला मिल कम्पाउंड वागळे इस्टेट येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.
Ganpat Gaikwad
Ganpat Gaikwad Saam tv
Published On

Thane News :

शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड अटकेत आहेत. मात्र गणपत गायकवाड यांचं नाव शासनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून असल्याने एकच चर्चा सुरु झाली. मात्र गणपत गायकवाड यांच्या नावामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'हिंदुस्थान टाईम्स'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकारच्या नमो महारोजगार मेळाव्याचे ठाण्यात आयोजन होत आहे. कोकण विभागामार्फत मॉडेला मिल कम्पाउंड वागळे इस्टेट येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. ६ मार्च आणि ७ मार्च असा दोन दिवस हा कार्यक्रम असणार आहे. मात्र गणपत गायकवाड यांचं नाव पाहुण्यांमध्ये आल्याने या रोजगार मेळाव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Ganpat Gaikwad
Raigad Politics: लोकसभेच्या जागावाटपाआधीच महायुतीत वादाची ठिणगी? एका मतदारसंघावर तिन्ही पक्षांचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पोस्टरमध्ये पाहुण्यांच्या यादीत गणपत गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख आहे. या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी मंगळवारी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या रोजगार मेळाव्यात ३५२ स्टॉल्स असणार आहेत. ज्यामध्ये जवळपास पहिल्या दिवशी १०७४ कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये ५६ हजारांहून अधिक तरुणांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या दिवशी १०४५ कंपन्या सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये ४४७७४ तरुणांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

Ganpat Gaikwad
Maharashtra Politics: राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप; ठाकरे गट भाजपशी हातमिळवणी करणार?

मात्र गणपत गायकवाड यांचं नाव पाहुण्यांच्या यादीत आल्याने हा रोजगार मेळावा चर्चेत आला आहे. २ फेब्रुवारी रोजी गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला होता. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. याप्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे. गणपत गायकवाड यांचा आरोपींमध्ये समावेश असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com