Maharashtra Politics: राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप; ठाकरे गट भाजपशी हातमिळवणी करणार?

Thackeray Group and BJP: राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप घडू शकतो. भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने वर्तवली आहे.
Pm Narendra Modi and Uddhav Thackeray
Pm Narendra Modi and Uddhav ThackeraySaam Tv

Thackeray Group May Again Form an Alliance with Bjp:

राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप घडू शकतो. भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने वर्तवली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि रश्मी उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना काही प्रसिद्धी माध्यमांनी अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले आहे की, ''शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपसोबत एनडीए आघाडीत आला तर राज्यातील राजकिय समिकरणं बदलणार.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pm Narendra Modi and Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : अमेरिकेला जमलं नाही ते PM मोदींनी केलं; त्या मोहिमेचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? जाणून घ्या

दीपक केसकर म्हणाले आहेत, ''आदित्य आणि रश्मी ठाकरे दिल्लीला गेले होते, असं मी माध्यमांकडून ऐकलं. त्यांनी भेट घेतली (पंतप्रधान मोदी यांची), मात्र ही भेट कुठल्या कारणासाठी होती? व्यक्तिगत कारणासाठी तर असू शकत नाही. म्हणून ही भेट कशासाठी होती.'' (Latest Marathi News)

आदित्य आणि रश्मी ठाकरे यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी भेट घेतली का? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, ''ही भेट तर झाली आहे, हे वृत्तपत्रात छापून आलं आहे. यातच अशी जर भेट झाली असेल, तर कोणाच्याही मनात शंका येणं स्वाभाविक आहे.''

Pm Narendra Modi and Uddhav Thackeray
Amit Shah Latest Speech : इंडिया आघाडीतील सर्व पक्ष घराणेशाही मानणारे; छत्रपती संभाजीनगरमधून अमित शहांचा हल्लाबोल

भाजप पुन्हा ठाकरे यांना सोबत घेणार असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, केसरकर म्हणाले, ''मला स्वतःला असं वाटतं नाही. मात्र ते प्रयत्न करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com