Devendra Fadnavis : अमेरिकेला जमलं नाही ते PM मोदींनी केलं; त्या मोहिमेचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : अमेरिकेला जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. मोदींनी आमचं चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरवून दाखवलं. आता भारताकडे इतर देश देखील मदत मागतात. मोदींनी जागतिक नेतृत्व उभं केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Digital

Devendra Fadnavis

वंदे भारत ट्रेन मोदींनी देशात तयार केली, विदेशी लोकांनीही स्तुती केली आहे. पुढच्या तीन ते चार वर्षांत रेल्वे स्टेशन विकसित करू, बस पोर्ट तयार करू गरिबांचं कल्याण करू, अशी आश्वासनं देत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थव्यवस्थेला चालना दिली, आमच्या सीमेवर आता पाकिस्तान किंवा चीन हल्ला करू शकत नाही मोदींनी भविष्यातला भारत घडवल्याचा दावा केला.

अमेरिकेला जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. मोदींनी आमचं चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरवून दाखवलं. आता भारताकडे इतर देश देखील मदत मागतात. मोदींनी जागतिक नेतृत्व उभं केलं. जगातल्या 100 देशांना मोदींनी कोविडची लस दिली, त्यामुळे आमचे नेते आणि विचार मोदी आहेत. संपूर्ण जग भारताच्या पाठीशी उभं करण्याचं काम मोदींनी केलं. त्यामुळेच पुढची पाच वर्षे हे भारताचे असणार आहेत, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, तेव्हा भारताला कुणीही रोखू शकत नसल्याचं ते म्हणाले.

Devendra Fadnavis
Rajiv Gandhi Zoological Museum : पिंजऱ्याचे गज वाकवून बिबट्याने ठोकली धूम, ३६ तासांपासून शोध सुरू; गेला बिबट्या कुणीकडे?

घराणेशाहीला हद्दपार करा- अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अमित शहा यांची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत विरोधकांवर निशाणा साधला.

"येणारी लोकसभा ही आत्मनिर्भर भारत बनवण्याची निवडणूक आहे. आपल्यासमोर सगळे परिवारवादी पक्ष आहेत. हे सर्व आपल्या मुलांना पंतप्रधान बनवण्याच्या मागे लागले आहेत. काँग्रेस पार्टीने 70 वर्ष 370 कलम लटकवत ठेवले. मोदीजींनी देशाला समृद्धी बनवण्याचे काम केले," असे अमित शहा यावेळी म्हणाले.

"मी मोदींची गॅरंटी सांगायला आलोय. तिसऱ्या नंबरवर भारताची अर्थव्यवस्था आणणार आहे. नरेंद्र मोदींचे पंचवीस वर्षाचे व्हिजन आहे. मुद्रा लोन दिले आहे. प्रत्येक घरात पाणी पोहोचण्याचे काम केले. काँग्रेसने मतांसाठी 70 वर्ष रामल्लाला टेन्टमध्ये ठेवले. तिसऱ्यांदा मोदीजींना 400 पार करा, असे म्हणत घराणेशाहीला पुढे करणाऱ्या पक्षांना मतदान करणार आहात का?" असा सवाल अमित शहा यांनी विचारला.

Devendra Fadnavis
Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा, काय आहे नेमकं प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com