आगामी लोकसभेची निवडणूक जशीजशी जवळ येत आहे. तसतसं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीत संघर्ष होण्याची चिन्ह आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कारण, एका लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गटाने दावा केला आहे. रायगड लोकसभेची ही जागा असून या जागेवर सध्या अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे खासदार आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यास भाजपसह शिंदे गटाने विरोध केला आहे. (Latest Marathi News)
रायगड लोकसभा मतदारसंघावर आधी भाजपने दावा केला होता. यावरून दोन्ही पक्षात वाद सुरू झाला होता. या वादात आता शिवसेनेने देखील उडी घेतली आहे. रायगड लोकसभेसाठी शिवसेनेकडून राजेश साबळे यांच्या नावाची घोषणा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात माणगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. आपण स्वतः यापूर्वी विधानपरिषद निवडणूक लढवली आहे, जरी पराभव झाला असला तरी आमचा तगडा जनसंपर्क आहे. आपण चार वेळेला जिल्हा परिषद गटाच्या चार वेगवेगळ्या मतदार संघातून निवडून आलो आहे. त्यामुळे या जागेसाठी मी शंभर टक्के इच्छुक असल्याचं राजेश साबळे यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यानी केलेल्या दाव्याचे आमदार भरत गोगावले यांनी समर्थन केलंय.जिल्ह्यात आम्ही एका विचाराने चाललो आहोत. रायगडमध्ये 6 पैकी 3 आमदार शिवसेनेचे असल्याने ताकद आमचीच आहे, असे गोगावले यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी काळात या जागेवरून महायुतीमधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.