Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Pune News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
Dagdusheth Halwai GanpatiSaam Tv
Published On
  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट 'अ' वर्ग पर्यटन दर्जा

  • पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराला मोठा मान

  • महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

  • पुणे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार

सागर आव्हाड, पुणे

देशभरातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला राज्य सरकारतर्फे ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यामुळे पुणेकरांना आनंद झाला आहे.

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
Hidden Pune Tourism : पुण्याजवळील Hidden मिनी गोव्यासारखं ठिकाण कधी पाहिलंय का? या विकेंडला नक्की करा प्लान

या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा आणि परिसर विकासाला मोठी चालना मिळणार आहे. १८९३ मध्ये स्थापन झालेल्या या ट्रस्टला तब्बल १३५ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. हे मंदिर केवळ भक्तीचे स्थान नसून, समाजसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनातही याचे मोठे योगदान आहे. दररोज देश-विदेशातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. यापूर्वी मंदिराला जिल्हा नियोजन समितीकडून ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त होता. संस्थेचे सामाजिक कार्य आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून या मंदिरास ‘अ’ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती.

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

‘अ’ वर्ग दर्जा मिळण्याचे फायदे -

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मंदिर आणि परिसराचा तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून सर्वांगीण विकास वेगाने होणार आहे. ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने राज्य सरकारकडून विकासासाठी थेट आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल. या निधीच्या माध्यमातून देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अद्ययावत दर्शन रांग व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ (पार्किंग), स्वच्छतागृहे, भक्तनिवास आणि सुरक्षेच्या अत्याधुनिक उपाययोजनांसारख्या पायाभूत सुविधा उभारणे शक्य होणार आहे. यामुळे पुण्यातील धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल.

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

१८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळवणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे पहिलेच गणेशोत्सव मंडळ आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या मागणीला पाठिंबा देत, ती पूर्ण केली. लाखो गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने मी देवेंद्रजी यांचे मनापासून आभार मानतो.

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com