सरकार कोसळणार? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत, ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

britain politics : ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
britain political News update
britain political News Saam tv
Published On
Summary

ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

ब्रिटनचे पंतप्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा

राजीनाम्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनी जवळच्या लोकांकडे पंतप्रधान पद सोडण्याची इच्छा दर्शवली आहे. स्टार्मर पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याचा दावा एका कॅबिनेट सदस्यानेही केला आहे. परंतु ते राजीनामा काही अटीवर देऊ शकतात, असा दावा केला जात आहे. पंतप्रधान स्टार्मर यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, स्टार्मर यांच्या प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. या नाराजीदरम्यान ब्रिटनच्या लेबर सरकारचं टेन्शन वाढलं आहे. पीटर मँडेलन यांची नियुक्तीवरून झालेला वाद, इतर गंभीर वाद, स्थानिक निवडणुकांमध्ये लेबर पक्षाची खराब कामगिरीमुळे स्टार्मर यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे.

britain political News update
पटेल-तटकरे दादांची राष्ट्रवादी फोडणार? राष्ट्रवादीतील 22 आमदार भाजपात जाणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

स्टार्मर यांच्या मंत्रिमंडळातील माजी आरोग्य सचिव वेस स्ट्रिटिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारला मोठा हादरा बसला. स्ट्रीटिंग यांनी म्हटलं की, लेबर पक्षात नेतृत्व करण्यासाठी स्टार्मर यांना आव्हान देऊ. पंतप्रधानपदासाठी देखील दावा करू. माजी आरोग्य सचिवांनी स्टार्मर यांना उद्देशून म्हटलं की, तुम्ही तुमचं पद सोडण्यासाठी एक वेळ निश्चित करा'.

स्टार्मर ठरताहेत टीकेचे धनी

ब्रिटनच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये घट होऊ लागली आहे. एका सर्व्हेनुसार, ६९ टक्के लोकांमध्ये ब्रिटनच्या लेबर पक्षाच्या स्टार्मर यांच्याविषयी नाराजी वाढली आहे. स्टार्मर हे आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात कमी लोकप्रिय पंतप्रधान ठरले आहेत. त्यांची तुलना लिझ ट्रस यांच्या पंतप्रधानपदाच्या ४९ दिवसांच्या कार्यकाळाशी केली जात आहे.

britain political News update
राष्ट्रवादीत कुरघोडीचं राजकारण टोकाला? कारकुनी चूक नव्हे, पटेल-तटकरेंची गच्छंतीच?

तत्पूर्वी, स्टार्मर यांच्या स्वत:च्या पक्षाचाही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास कमी होऊ लागला आहे. अनेक खासदारांना स्टार्मर यांच्याविषयी वाढत्या नाराजीची चिंता वाटू लागली आहे. त्यांच्याविषयी नाराजी वाढल्याने भविष्यात लेबर सरकार स्थापन करण्याच्या संधी धोक्यात येतील, असाही दावा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com