राष्ट्रवादीत कुरघोडीचं राजकारण टोकाला? कारकुनी चूक नव्हे, पटेल-तटकरेंची गच्छंतीच?

Ncp Internal Conflict Patel Tatkare Delhi Office Row: पटेल आणि तटकरेंचं पक्षातलं पद काढून घेतल्याच्या चर्चांनंतर आता दादांच्या राष्ट्रवादीच्या दिल्लीतल्या कार्यालयात पटेल आणि तटकरेंना प्रवेशबंदी करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी परसलीय. नेमकं काय आहे यात तथ्य आणि राष्ट्रवादीत कसं सुरू आहे कुरघोडीचं राजकारण ?..पाहूयात विशेष रिपोर्ट..
Praful Patel and Sunil Tatkare at the center of NCP’s internal power struggle amid Delhi office controversy.
Praful Patel and Sunil Tatkare at the center of NCP’s internal power struggle amid Delhi office controversy.saam tv
Published On

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष टोकाला गेल्याची चर्चा आहे. कारण राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नसणं ही कारकुनी चूक नसल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. कारण राष्ट्रवादीच्या दिल्लीतल्या कार्यालयात असलेले राष्ट्रीय सचिव संजय प्रजापती यांनी याबाबत थेय विधान केलंय. पटेल आणि तटकरे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना पटेलांच्या कार्याध्यक्ष पदाविषयी विचारले असता त्यांनी कार्यकारिणीच्या पत्राचा दाखला देत सदस्यच असल्याचा पुनरूच्चार केला. तर आपल्याला ४० वर्षांच्या राजकारणाचा अनुभव असून योग्यवेळी बोलणार असल्याचं सूचक विधान खासदार सुनील तटकरेंनी केलंय.

तर हे कमी होतं की काय दिल्लीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना प्रवेशबंदी केल्याचं वृत्त वाऱ्यासारखं परसलं. दिल्लीतल्या कार्यालयाचा पार्थ पवारांच्या निकटवर्तीयांनी ताबा घेतल्याची जोरदार चर्चा रंगली. मात्र राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी हे वृत्त फेटाळून लावलंय. मात्र हे सांगताना त्यांनीही पटेल आणि तटकरे यांचा लोकसभा आणि राज्यसभेतील नेता असाच केला. तसंच पुढच्या काळात काय होईल ते माहित नसल्याचं सूचक विधान करायलाही ते विसरले नाहीत.

राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींमुळे पटेल-तटकरे कमालीचे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळे त्यांनी १२ मे रोजी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय़. दादांच्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडीच्या बातम्या त्यांनी पवारांच्या कानावर घातल्याचं समजतंय. पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी फोडण्यात तटकरे आणि पटेलांचा मोठा वाटा होता अशी नेहमीच चर्चा होते. मात्र आता त्याच दोघा नेत्यांना तोडगा काढण्यासाठी अखेर पवारांकडेच धाव घ्यावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com