Mumbai Local: ६ स्थानके, ८ मोठे उड्डाणपूल, लोकलची गर्दी होणार कमी; सरकारचा मोठा प्लान
Mumbai LocalSaam Tv

Mumbai Local: ६ स्थानके, ८ मोठे उड्डाणपूल, लोकलची गर्दी होणार कमी; सरकारचा मोठा प्लान

Badlapur To Karjat 3rd and 4th Line: बदलापूर ते कर्जतदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण ते कर्जतदरम्यानची लोकल वाहतूक सुसाट होईल.
Published on

Summary -

  • बदलापूर- कर्जत तिसरी आणि चौथी मार्गिकेला मंजुरी देण्यात आली.

  • या मार्गिकांमुळे लोकलची गर्दी कमी होण्यास मदत होईल

  • ६ स्थानके, ८ मोठे उड्डाणपूल आणि १०६ छोटे पूल तयार होणार आहेत

  • मालगाड्या आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग मिळाल्याने लोकल वेळेवर धावतील

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण येत्या काही वर्षात त्यांचा प्रवास गर्दीमुक्त होणार आहे. यामागचं कारण म्हणजे केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जत तिसऱ्या चौथ्या मार्गिकेला मंजुरी दिली. हे काम जलद गतीने पूर्ण झाल्यानंतर कर्जत ते ठाणे दरम्यानच्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होईल. परिणामी गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त होईल.

कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. आता बदलापूर ते कर्जतपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी मिळाली. बदलापूर ते कर्जत या ३२ किमी लांबीच्या मार्गावर ६५ किमी लांबीच्या रेल्वे मार्गिकांचे काम करण्यात येणार आहे. सहा स्थानकांमधून या मार्गिका जाणार आहेत. यामध्ये ८ मोठे उड्डाणपूल, १०६ छोटे पूल तयार करण्यात येणार आहेत. तसंच एका भुयारी मार्गाचा देखील समावेश असणार आहे.

Mumbai Local: ६ स्थानके, ८ मोठे उड्डाणपूल, लोकलची गर्दी होणार कमी; सरकारचा मोठा प्लान
Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

बदलापूर ते कर्जंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला परवानगी मिळाल्यामुळे आता कल्याण ते कर्जतपर्यंत तिसरी आणि चौथी मार्गिका मिळेल. यामुळे कल्याण रेल्वे स्थानकावर बराच वेळ थांबणाऱ्या मालगाड्या, मेल, एक्स्प्रेस यांचा प्रवास वेळेत होईल. परिणामी लोकल देखील वेळेवर धावतील. कल्याणच्या पुढे कर्जतपर्यंत फक्त दोनच मार्गिका आहेत. याच मार्गावर लांबपल्ल्याच्या ट्रेन, मालगाड्या आणि लोकलही धावतात. त्यामुळे अनेकदा लोकलचा खोळंबा होतो आणि लोकलसेवा उशिरा धावतात.

Mumbai Local: ६ स्थानके, ८ मोठे उड्डाणपूल, लोकलची गर्दी होणार कमी; सरकारचा मोठा प्लान
Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू, तोल गेला अन् रूळावर पडला

अनेकदा लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होते. परिणामी याचा परिणाम लोकलसेवेवर होतो आणि लोकलचे वेळापत्रक कोलमडते. तिसरी आणि चौथी मार्गिका तयार झाल्यानंतर मेल, एक्स्प्रेस आणि मालगाड्या स्वतंत्र मार्गिकेवरून धावल्यामुळे लोकलप्रवासात अडथळा येणार नाही आणि त्या वेळेत धावतील. यामुळे कर्जत ते कल्याणपर्यंत प्रवाशांना लोकलच्या गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

Mumbai Local: ६ स्थानके, ८ मोठे उड्डाणपूल, लोकलची गर्दी होणार कमी; सरकारचा मोठा प्लान
Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची चाचणी लवकरच, सूरत स्टेशनचा लूक पाहून व्हाल चकीत; पाहा VIDEO

कर्जत ते कल्याण या मार्गावर शटल सेवा सुरू होतील. ठाणे ते कर्जत उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ होईल. मालवाहतुकीला चालना मिळेल आणि ती देखील सुसाट होईल. मुंबई ते पुणे मार्गावर दरवर्षी ४१ लाख लीटर डीझेलची बचत होईल. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेमुळे कर्जत ते कल्याणदरम्यान असणाऱ्या रेल्वे स्थानकावर राहणाऱ्या नागरिकांना गर्दीमुक्त प्रवास करता येईल. महत्वाचे म्हणजे या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेमुळे कल्याण ते कर्जतदरम्यान असणाऱ्या सर्व रेल्वेस्थानकांचा विकास आणि कायापालट होईल.

Mumbai Local: ६ स्थानके, ८ मोठे उड्डाणपूल, लोकलची गर्दी होणार कमी; सरकारचा मोठा प्लान
Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com