Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

Local Train Accident in Mumbai: सीएसएमटी येथे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. याचदरम्यान मध्य रेल्वेवरील सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ एक भीषण अपघात झालाय.
Mumbai  Local Train
Passengers on railway tracks; accident spot being inspected near Sandhurst Road station.saamtv
Published On
Summary

रुळांवरून चालणाऱ्यांना लोकल ट्रेनने धडक दिली.

रेल्वे प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे.

सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तपास सुरू आहे.

मध्य रेल्वे मार्गावर आज सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. यात दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला. सीएसएमटी स्थानकावर आज काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली. जवळपास एक तास उशिराने लोकल धावत होत्या. लोकलची वाट पाहून पाहून वैतागलेल्या प्रवाशांनी शेवटी पायी जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी एका लोकलच्या धडकेत तिघांचा मृ्त्यू झालाय.

नेमकं कसा घडला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, सँन्डहर्स्ट रोड स्थानकापासून कल्याणच्या दिशेने तीन व्यक्ती हे रेल्वे रुळावरुन चालत होते. यादरम्यान पाठीमागून एक लोकल ट्रेन आली. यामुळे या लोकांना धडक बसली. त्यानंतर या तिघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या व्यक्तींवर उपचार चालू असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलीय.

ट्रॅकवरुन गाडी जाते त्यावेळेस गाडीचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे त्याची रिअॅक्शन टाईम कमी वेळात थांबवणं. तसेच अंधारात थांबवणं शक्य नसते, त्यामुळे प्रवासी आणि आजूबाजूच्या रहिवाशांना ट्रॅक पास करू नका. ट्रॅकवरुन चालू नका, असं आवहन केले जातं. वारंवार प्रवाशांना विनंती करतो की, ट्र्रॅकवर चालू नये. त्यामुळे इजा पोहोचू शकते, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलीय.

Mumbai  Local Train
Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातात मोठी कारवाई, २ इंजिनीअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

दरम्यान, वारंवार प्रवाशांना विनंती करत असतो, कृपया रेल्वे ट्रॅक पास करू नका. आतादेखील आम्ही विनंती करतो की, कृपया आपण रेल्वे ट्रॅक क्रॉस करू नये. दरम्यान या घटनेमागे काय कारणे होती, जखमी प्रवासी होते की बाहेरची व्यक्ती होती याची माहिती मिळेल, त्यानंतरच बोलता येईल", अशी प्रतिक्रिया मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी माध्यमांना दिलीय.

Mumbai  Local Train
Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, फास्ट लोकलने उडवल्याने तिघांचा मृत्यू

मृतांची नावे आले समोर

चार प्रवाशांना लोकलने धडकली दिली असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

अज्ञात पुरूष – मृत घोषित करा

२) हेली मोहमाया (वय १९ वर्षे) - मृत घोषित करा

३) कैफ चोघले (वय २२ वर्षे) - दाखल स्थिती प्रलंबित

४) खुशबू (वय ४५ वर्षे) - दाखल स्थिती प्रलंबित

मुंबई रेल्वे प्रवासी संघाचा निषेध

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र रेल्वे पोलिसांनी अत्यंत सखोल तपास करून तपशीलवार अहवाल तयार केला. या तपासासाठी त्यांनी VJTI (Veermata Jijabai Technological Institute) सारख्या नामांकित तांत्रिक संस्थेच्या मदतीने घटनास्थळाचे बारकाईने विश्लेषण करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष सादर केले. सध्या या प्रकरणावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

अशा निर्णायक टप्प्यावर रेल्वे कर्मचारी संघटनांनी (CRMS) न्यायालयीन कारवाईत अडथळे निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रवाशांना वेठीस धरणे, तसेच अतिगर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकांवर आंदोलन करणे, हे कायद्याने गुन्हा असून मानवी दृष्ट्याही अमानवीय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com