Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Vande Bharat Train: रेल्वे प्रवास खास आणि आरामदायी बनवण्यासाठी भारतीय रेल्वे मोठी योजना आखत आहे. वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्यामुळे भारतीय रेल्वेचा प्रवासाचा आरामदायी आणि वेगवान झाला. आता २०२६ पर्यंत अनेक नवीन रेल्वे प्रकल्प सुरू होणार आहेत.
Vande Bharat Train:
Indian Railways will launch Vande Bharat Sleeper and upgraded Amrit Bharat Express trainssaam tv
Published On
Summary

वंदे भारत स्लीपर व अमृत भारतच्या नवीन ट्रेन सेवा सुरू होणार आहेत.

वंदे भारतची स्लीपर आवृत्ती लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खास डिझाइन केली आहे.

अमृत भारत एक्सप्रेस आता एसी कोचेससह अधिक आधुनिक स्वरूपात येत आहे.

रेल्वेतून लाखो प्रवाशी प्रवास करतात. देशात वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रवास अधिक आरामदायी झालाय. आता या गाड्यांची संख्या अजून वाढवली जाणार आहे. २०२६ पर्यंत अनेक नवीन रेल्वे प्रकल्प सुरू होणार आहेत. वंदे भारत,अमृत भारत रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली जाणार आहे. वंदे भारत ट्रेनला भारतीय रेल्वे आता वंदे भारतला स्लीपर आवृत्तीमध्ये आणणार आहे.

Vande Bharat Train:
Vande Bharat News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या दोन स्थानकांवर वंदे भारतचा थांबा

२०२६ पर्यंत अनेक वंदे भारत स्लीपर लॉन्च केल्या जाणार आहेत. यासोबतच अमृत भारत एक्सप्रेस देखील एसीमध्ये उपलब्ध असणार आहे. अमृत भारत एक्सप्रेस आणि नमो भारत ट्रेनमुळे सामान्य माणसाचा प्रवास आणखी आरामदायी होईल, अशी अपेक्षा आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन

भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर आवृत्ती आणणार आहे. आतापर्यंत फक्त चेअर कार म्हणून उपलब्ध असलेली ही ट्रेन आता लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी अधिक सोयीस्कर होतील कारण, या आता स्लीपरमध्ये येणार आहेत. २०१९ मध्ये लाँन्च झाल्यापासून वंदे भारत एक्सप्रेस वेग आणि आरामासाठी प्रसिद्ध आहे. आता ही ट्रेन स्लीपर व्हर्जन येणार आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या एसी कोचचा नमुना सादर करण्यात आला आहे. तो किनेट रेल्वे सोल्युशन्स नावाच्या भारत-रशियन संयुक्त उपक्रमाने डिझाइन करण्यात आलाय. हे मॉडेल आधुनिक, आकर्षक आणि प्रवाशांसाठी अनुकूल दिसते.

Vande Bharat Train:
मनमाड-जळगावकरांना दिलासा! १६० अंतराची तिसरी रेल्वेलाइन सुरू; २२ मोठे, २९५ छोटे पूल अन् १२ स्टेशन, असा असेल मार्ग

इंटीरियरचे खास फीचर्स

प्रीमियम फर्स्ट क्लास केबिन

आरामदायी जागा आणि स्लीपर बर्थ

पाण्याच्या बाटली ठेवण्यास जागा

रीडिंग लाइट्स आणि चार्जिंग पॉइंट्स

स्वयंचलित दरवाजे आणि विमानासारखे आतील भाग

ट्रेनचा वेग आणि फीचर्स

ऑपरेशनल वेग: १६० किमी/तास

कमाल वेग: १८० किमी/तास

प्रवासी क्षमता: अंदाजे १,१२८

सुरक्षितता उपाय आणि फीचर्स

यात क्रॅश बफर आणि डिफॉर्मेशन ट्यूब आहेत. डब्यांमध्ये आग प्रतिरोधक भिंती बसवण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये वाय-फाय सेवा, आधुनिक स्लीपर बर्थ आणि एअरलाइन शैलीतील आतील भाग असेल.

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ कोच असतील. ही ट्रेन फर्स्ट एसी, सेकंड एसी (२-टियर), थर्ड एसी (३-टियर) मध्ये बनवली जाणार आहे. अमृत भारत एक्सप्रेसमध्ये बदल केले जातील, या सुविधा जोडल्या जातील. अमृत ​​भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना आता एसी कोचची सुविधा देखील मिळणार आहे. ट्रेनची तिसरी आवृत्ती लवकरच रेल्वे ट्रकवर धावणार आहे. चेन्नई इंटिग्रेटेड रेल कोच फॅक्टरीमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या वातानुकूलित (एसी) कोचचे उत्पादन वेगाने सुरू करण्यात आले आहे.

नवीन अमृत भारत एक्सप्रेस ३.० च्या कोच रचनेला रेल्वे बोर्डाने मान्यता दिलीय. या २२ डब्यांच्या ट्रेनमध्ये सहा द्वितीय श्रेणीचे स्लीपर आणि सहा सामान्य कोच असतील. यामध्ये एक प्रथम-वातानुकूलित, दोन द्वितीय-वातानुकूलित आणि सहा तृतीय-वातानुकूलित कोच असतील. तसेच एक वातानुकूलित पेंट्री देखील असणार आहे. पुढील आणि मागील बाजूस एक पॉवर कोच असेल. २०२३ मध्ये सुरू होणाऱ्या अमृत भारत ट्रेन्स कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी परवडणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या सेवा देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com