Badlapur News : बदलापुरात भाजपला मोठा धक्का; अर्ज भरण्याच्या अर्धा तासाआधी बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Badlapur News update : बदलापुरात भाजपला मोठा धक्का बसलाय. अर्ज भरण्याच्या अर्धा तासाआधी बड्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Badlapur news
Badlapur News update Saam tv
Published On
Summary

बदलापुरात भाजपला शिवसेनेचा मोठा धक्का

भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय भोईर शिवसेनेत

अर्ज भरण्याच्या अर्धा तास आधी शिवसेनेत केला प्रवेश

मयुरेश कडव, साम टीव्ही

राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरत आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारांसहित राजकीय नेत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बदलापुरात महायुतीमध्येच नगरपरिषदेच्या निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या अर्धा तासाआधी बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला.

Badlapur news
मुंबईत चाललंय काय? किल्ल्यावर चक्क दारूची पार्टी; परवानगी मिळाली कशी? ठाकरे गटाचा सवाल, VIDEO

बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळालं आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटचा अर्धा तास शिल्लक असताना भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय भोईर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. भोईर यांचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केलं. बदलापुरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपचे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे आणि माजी शहराध्यक्ष संजय भोईर यांच्यात तिकीट मिळवण्यासाठी जोरदार चुरस होती.

Badlapur news
Bus Fire : क्षणात सर्व काही घडलं, पिंपरी-चिंचवडमध्ये PMPML बस आगीच्या भक्ष्यस्थानी; राज्यात दिवसभरातील तिसरी घटना

भाजप पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज संजय भोईर यांनी अवघ्या काही क्षणात भाजपाला सोडून शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतय. संजय भोईर हे माजी खासदार कपिल पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात. कपिल पाटील यांच्यावर बदलापूर नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे संजय भोईर यांचा शिवसेना प्रवेश कपिल पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.

Badlapur news
Indurikar Maharaj : साखरपुड्यापेक्षा मुलीचं लग्न टोलेजंग करणार;ट्रोलिंगनंतर इंदुरीकर महाराज भडकले,VIDEO

बदलापुरात ट्रान्सजेंडर रोशनी निवडणुकीच्या मैदानात

बदलापुरात एक ट्रांसजेंडरही निवडणुकीच्या मैदानात उतरलीय. रोशन उर्फ रोशनी सोनकांबळे असं या ट्रान्सजेंडरचं नाव आहे. तिने प्रभाग क्रमांक 10 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. निवडून आल्यानंतर प्रभागात कामं केली नाहीत, तर माध्यमांसमोर आपल्या तोंडाला लोकांनी काळं फासावं असं चॅलेंजच रोशनीनं दिलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com