Indurikar Maharaj : साखरपुड्यापेक्षा मुलीचं लग्न टोलेजंग करणार;ट्रोलिंगनंतर इंदुरीकर महाराज भडकले,VIDEO

indurikar maharaj kirtan : मुलीच्या शाही साखरपुड्यानंतर ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज इरेला पेटलेत.. त्यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांना आव्हान दिलंय. इंदुरीकरांनी आता काय ठरवलंय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Indurikar Maharaj news
Indurikar MaharajSaam tv
Published On

साधेपणाने लग्न करण्याचं ग्यान देणाऱ्या इंदुरीकरांनी मुलीचा शाही साखरपुडा केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर इंदुरीकर ट्रोल झाले... त्यानंतर इंदूरीकरांनी किर्तन सोडणार असल्याचं हे वक्तव्य केलं... दरम्यान इंदुरीकरांचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय.. त्यात इंदुरीकर आता इरेला पेटलेत.. मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार.. तु काय करायचं ते कर, असं म्हणत इंदुरीकरांनी ट्रोल करणाऱ्यांना चॅलेंज दिलंय...

Indurikar Maharaj news
ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा हादरा; विश्वासू नेत्यानं साथ सोडली, तडकाफडकी राजीनामा

खरंतर निवृत्ती देशमुख हे इंदुरीकर महाराज म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत.. त्यांनी अनेक किर्तनात लग्न साधेपणाने करण्याबाबत ग्यान दिलंय.

इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यासाठी महागड्या गाड्यांचा ताफा होता. राजेशाही थाटात मुलगी आणि जावयाची रथावरुन मिरवणूक काढली. डोळे दिपून टाकणारा हा सगळा झगमगाट होता. तर दुसरीकडे साधं लग्न केलं तरी मुलं होतात, अशा शब्दात महाराजा किर्तनातून लग्नाच्या खर्चावर आसूड ओढायचे...त्यामुळे महाराजांची दुटप्पी भूमिका अनेकांना खटकली आहे..त्यामुळेच त्यांच्या टीकेची झोड उठली आहे.

Indurikar Maharaj news
Pune : संशयित दहशतवादी हंगरगेकरची कुंडली समोर; पुण्यात १५ वर्ष कुठं काम करत होता? तपासात धक्कादायक माहिती उघड

ग्रामीण भागात इंदुरीकरांना मानणारा मोठा वर्ग आहे.. अनेकदा त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही लोकं त्यांच्या किर्तनाला गर्दी करायचे... कित्येक महिन्यांच्या तारखा बूक असायच्या.... मात्र आता इंदुरीकरांच्या कथनी आणि करणीतच फरक दिसून आलाय.. त्यामुळे इंदुरीकरांची अवस्था लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी झालीय.. त्यामुळे इंदुरीकर इरेला पेटण्याऐवजी आतातरी दोन पाऊलं मागे येत चिंतन करणार का? आणि ग्यान वाटताना विचार करणार का? याचीच उत्सुकता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com