सचिन जाधव, साम टीव्ही
पुणे: राजगड तालुक्यातील घिसर गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नपूर्व हळदीचा समारंभ आटोपून परतत असताना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात नवरा-नवरीसह नऊ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे विवाह सोहळ्याचा आनंदावर काहीवेळ विरझण पडले होते.
घिसर येथील संकेत शिंदे आणि संध्याराणी धिडले यांचा विवाह सोहळा आज पार पडणार याजे. या सोहळ्यापूर्वी गावातील जुगाई देवी मंदिरात पारंपारिक हळदीचा विधी आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नवरा नवरी आणि त्यांचे नातेवाईक मंदिरात गेले होते. विधी पूर्ण करून सर्वजण पायवाटेने घराकडे परतत असताना जंगल परिसरातील झुडपामध्ये असलेल्या मधमाशाच्या पोळ्याला काहीतरी लागल्याने मधमाशांनी अचानक उपस्थितांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यात सुमारे 20 ते 25 जणांच्या समूहावर मधमाशांनी झडप घातली. यामध्ये 9 जण गंभीर जखमी झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून जखमीना लग्नासाठी आलेल्या वाहनांमधून तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वेल्हे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमीवर तातडीने उपचार करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून प्रकृतीत सुधारणा झाल्याने आता लग्न सोहळा नियोजित वेळेत पार पडणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.