Badlapur Tourism : धबधबे, डोंगर अन् घनदाट जंगल; 'बदलापूर'मध्ये लपलंय ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

Shreya Maskar

बदलापूर

ठाणे शहराच्या जवळ वसलेले 'बदलापूर' हे एक दिवसाच्या सहलीसाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यातील धबधबे, प्राचीन मंदिरे येथे पाहायला मिळतात.

Badlapur Tourism | saam tv

पर्यटन स्थळे

बदलापूर येथील प्रमुख आकर्षणामध्ये कोंडेश्वर मंदिर, कोंडेश्वर धबधबा, बारवी धरण, चिखलोली धरण आणि विष्णूबाग सारखी सुंदर ठिकाणे आहेत.

Tourist | google

कोंडेश्वर मंदिर

कोंडेश्वर मंदिर हे प्रामुख्याने भगवान शिवाला (महादेव) समर्पित असलेले एक प्राचीन आणि प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. ते घनदाट जंगलात वसलेले आहे.

Kondeshwar Temple | google

कोंडेश्वर धबधबा

कोंडेश्वर धबधबा हा घनदाट जंगलाने आणि सह्याद्रीच्या उंच टेकड्यांनी वेढलेला एक अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.

Kondeshwar Waterfall | google

बारवी धरण

बदलापूर येथील बारवी धरण हा ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरे आणि औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवणारा एक प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे. येथे गेल्यावर सभोवतालच्या हिरव्यागार निसर्ग सौंदर्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

Barvi Dam | google

चिखलोली धरण

बदलापूर जवळ चिखलोली धरण आहे. हे ठिकाण वन डे ट्रिपसाठी उत्तम लोकेशन आहे. वीकेंडला तुम्ही येथे नक्की जाऊ शकता.

Chikhloli Dam | google

बॅरेज रिवर पॉइंट

बॅरेज रिवर पॉइंट येथे नदीचे शांत आणि प्रसन्न दृश्य दिसते. तसेच येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा देखील पाहायला मिळतो. बदलापूरच्या जवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगेत चंदेरी किल्ला हा एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे, जो ट्रेकिंगसाठी अत्यंत लोकप्रिय आहे.

Barrage River Point | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Weekend Trips | yandex

NEXT : उन्हाळ्यात घ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद; थंडगार पाण्यात येईल मजा, मुंबईजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Mumbai Tourism | yandex
येथे क्लिक करा...