

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीवरून राष्ट्रवादीत बंडखोरी
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीतील बंडखोरांना थेट इशारा
पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडावर सुनेत्रा पवारांचा पलटवार
बारामतीमध्ये सध्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरुय. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरीमुळे राजकीय वातावरण तापलंय. या बंडखोरीवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडाळी करणाऱ्यांना गंभीर इशारा दिलाय. अजितदादा मोठे मनाचे होते, पण मी दादासारखी नाहीये. तुम्ही एकदा बाहेर गेलात तर कायमचे बाहेरचेच व्हाल, असा इशारा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रचारसभेत बोलताना दिलाय.
राष्ट्रवादीतून बंडाचे निशाण उभारलेले नेते पुरुषोत्तम जगताप यांना भाजपच्या पाठिंब्याने 'लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल' निवडणूक रिंगणात उतरवलंय. या पार्श्वभूमीवर अजितदादांचे नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवून दाखवा, असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलंय. त्या आव्हानाला पुरुषोत्तम जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता पुन्हा एकदा पुरुषोत्म जगताप यांना इशारा दिला.
आपल्या सर्वांचे संबंध चांगलेत. नंतर कोण जवळ येणार अशा अनेक अफवा आहेत. कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते दादांसारखी मी नाही” असा थेट इशारा त्यांनी पुरुषोत्तम जगताप यांचे नाव न घेता दिलाय. अनेक चुकीच्या अफवा ऐकायला येत आहेत. कारखान्याचा अध्यक्ष हा सर्वसमावेशक असेल. सर्वांच्या मर्जीनूसार अध्यक्षांची निवड केली जाईल. अध्यक्ष अगोदर ठरवलेला नाहीये. निवडणुकीच्या निकालानंतर कोण अध्यक्ष ठरवू” असंही त्या यावेळी म्हणाल्या.
मंगळवारी जय पवार यांच्याहस्ते श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी जय पवार यांनीही पुरुषोत्तम जगताप यांना इशारा दिला होता. तसेच त्यांनी जगताप यांच्यावर कारवाई केली जाईल असं म्हटलंय. सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ वापरून ते त्यांच्या पॅनेलचा प्रचार करत आहेत.त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करणार आहोत” असं जय पवार यांनी सांगितलं. जगताप हे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नावानेच त्यांच्या पॅनलचा प्रचार करत असल्याचं जय पवार म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.