Mumbai : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची फसवणूक! बँक खात्यातून परस्पर पैसे गायब

Mumbai Aishwarya Thackeray Cyber Crime News : अभिनेता ऐश्वर्य ठाकरे यांची ऑनलाइन सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या बँक खात्यातून सहा अनधिकृत व्यवहारांद्वारे १९ हजार १५ रुपये काढण्यात आले.
Actor Aishwarya Thackeray online banking fraud case
Actor Aishwarya Thackeray online banking fraud caseAI Image
Published On: 
Summary
  • बाळासाहेब ठाकरे यांचा नातू अभिनेता ऐश्वर्य ठाकरे याची ऑनलाइन फसवणूक

  • त्यांच्या बँक खात्यातून परवानगीशिवाय एकूण सहा व्यवहार करण्यात आले.

  • सहाही व्यवहारांमधून एकूण १९ हजार १५ रुपये काढण्यात आले.

  • ३० ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना त्यांच्या लक्षात आली

संजय गडदे, मुंबई

सायबर चोरट्यांनी आता सामान्य नागरिकांसोबतच प्रसिद्ध व्यक्तींनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि अभिनेता ऐश्वर्य ठाकरे यांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या बँक खात्यातून परवानगीशिवाय सहा वेळा पैसे काढण्यात आले. या सर्व व्यवहारांमधून एकूण १९ हजार १५ रुपये गायब झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात चर्चेला सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी रात्री ऐश्वर्य ठाकरे यांच्या बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला खात्यातून एकदाच पैसे गेल्याचा त्यांना संशय आला. मात्र, त्यांनी बँक खात्याची माहिती तपासली असता आणखी व्यवहार झाल्याचे दिसून आले. अशा प्रकारे एकूण सहा व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. या सर्व व्यवहारांची रक्कम मिळून १९ हजार १५ रुपये होती.

Actor Aishwarya Thackeray online banking fraud case
Blood Sugar : गोड पदार्थ खाणं बंद करूनही रक्तातील साखर वाढतेय? रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायत जीवघेण्या

या प्रकारानंतर ऐश्वर्य ठाकरे यांनी तातडीने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात हे सहाही व्यवहार परदेशातून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाचा तपास केला जात आहे. आरोपींनी बँक खात्याची माहिती कशी मिळवली, पैशांची चोरी करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला आणि या फसवणुकीमागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे. अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही.

Actor Aishwarya Thackeray online banking fraud case
Maharashtra Drought : सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार, २९१ कोटींचा निधी मंजूर

दरम्यान, ऐश्वर्य ठाकरे हे स्मिता ठाकरे आणि दिवंगत जयदेव ठाकरे यांचे पुत्र आहेत. राजकीय कुटुंबात जन्म झाला असला तरी त्यांनी राजकारणाऐवजी अभिनय क्षेत्रात आपले करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. अनुराग कश्यप यांच्या 'निशांची' या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. एका प्रसिद्ध कुटुंबातील व्यक्तीच्या बँक खात्यातून अशा प्रकारे पैसे काढण्यात आल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आणि आरोपींची माहिती पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.