Maharashtra Drought : सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार, २९१ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Farmer Drought Relief News : महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक आणि शेतजमिनीच्या नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे.
Maharashtra Farmer Drought News
Maharashtra Farmer Drought News AI Image
Published On: 
Summary
  • अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मंजूर

  • पीक नुकसानभरपाईसाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी.

  • शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटी २१ लाख ९ हजार रुपये मंजूर.

  • राज्यातील ३ लाख ९ हजार २८९ शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईचा लाभ मिळणार.

  • सुमारे २ लाख ६८ हजार ९१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जून ते ऑगस्ट २०२६ या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने २९१ कोटी ९१ लाख ४ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मंजूर केलेल्या एकूण निधीपैकी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपये शेतीपिकांच्या नुकसानीपोटी दिले जाणार आहेत. तर २९ कोटी २१ लाख ९ हजार रुपये शेतजमिनीच्या नुकसानीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. शेतीपिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील ३ लाख ९ हजार २८९ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. सुमारे २ लाख ६८ हजार ९१८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि नाशिक या विभागांतील बाधित शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

Maharashtra Farmer Drought News
Blood Sugar : गोड पदार्थ खाणं बंद करूनही रक्तातील साखर वाढतेय? रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायत जीवघेण्या

सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, धाराशिव, जालना, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. दरम्यान, पुरामुळे शेतजमिनीचे नुकसान झालेल्या ३४ हजार ९८४ शेतकऱ्यांसाठीही सरकारने निधी मंजूर केला आहे. यामध्ये ७ हजार ६७५.४० हेक्टर बाधित क्षेत्राचा समावेश आहे. जमीन वाहून जाणे, शेतात वाळू किंवा गाळ साचणे तसेच क्षारयुक्त जमीन होणे अशा नुकसानीसाठी मदत दिली जाणार आहे.

Maharashtra Farmer Drought News
Pune Metro 3 : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो लाईन-३ चं आज लोकार्पण, कोण कोणत्या स्थानकावर थांबणार?

या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक जमीनमालक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मदत मिळेल. तसेच नुकसानभरपाईची रक्कम बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करू नये किंवा इतर वसुलीसाठी वापरू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना द्याव्यात, असे निर्देशही सरकारने दिले आहेत. या निर्णयामुळे अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.