Pune Metro 3 : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो लाईन-३ चं आज लोकार्पण, कोण कोणत्या स्थानकावर थांबणार?

Pune Metro 3 News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ चे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण होणार असून उद्यापासून १७ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू होणार आहे.
Pune Metro 3 News
Pune Metro 3 News AI image
Published On: 
Summary
  • पुणे मेट्रो लाईन-३ उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार.

  • माण-हिंजवडी ते शिवाजीनगर असा या मेट्रोचा मार्ग असणार आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाइन लोकार्पण होणार आहे.

  • या मार्गावर एकूण १७ मेट्रो स्थानके आहेत.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर धावणारी पुणे मेट्रो लाईन-३ उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे. या मेट्रो मार्गाचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

या मेट्रो मार्गावर एकूण १७ स्थानके आहेत. या सर्व स्थानकांवरून उद्यापासून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे, गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामानिमित्त हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना तसेच शिवाजीनगर परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune Metro 3 News
Blood Sugar : गोड पदार्थ खाणं बंद करूनही रक्तातील साखर वाढतेय? रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायत जीवघेण्या

हिंजवडी हा पुण्यातील महत्त्वाचा आयटी परिसर आहे. या भागात दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी कामासाठी येतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी गर्दी असते. मेट्रो सुरू झाल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

Pune Metro 3 News
Metro 5 : ठाणे, भिवंडी आणि कल्याणकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो ५ च्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा

या मेट्रो सेवेमुळे पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. पुणेकरांचा प्रवास जलद आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या या मेट्रो सेवेकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.