Mumbai News: मुंबईकरांसाठी खास कलापर्व! नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत बालचित्रकला प्रदर्शनाची रंगत

Baladisha Children's Art Exhibition: मुंबईतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे ३२ व्या ‘बालदिशा’ बालचित्रकला प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन! प्रदर्शनाची वेळ, ठिकाण आणि सविस्तर माहिती जाणून घ्या.
Baladisha Children's Art Exhibition
Baladisha Children's Art Exhibition Saam Tv
Published On: 

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये ३२ वा बालदिशा कार्यक्रम पार पडला. खास लहानमुलांसाठी त्यांच्या कलागुणांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने Little Hands, Big Imagination’ या बालचित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले.

या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून नेहरू सेंटर आर्ट गॅलरीचे असिस्टंट डायरेक्टर श्री. संतोष पेडणेकर, रचना संसद कॉलेज, मुंबई येथील अप्लाइड आर्ट विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा कांबळे, TET चे CEO श्री. नीरज कुमार आणि फॅबर-कॅसल इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर तसेच ज्येष्ठ चित्रकार श्री. रुपेश पाटील उपस्थित होते.

Baladisha Children's Art Exhibition
Chashma Cleaning Tips: चष्मा स्वच्छ कसा करायचा? जाणून घ्या

‘बालदिशा’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून बालकलाकारांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विविध माध्यमांतून आणि विषयांतून साकारलेल्या बालचित्रांमध्ये मुलांची निरीक्षणशक्ती, विचारांची अभिव्यक्ती आणि कलात्मक दृष्टिकोन यांचे सुंदर दर्शन घडते. लहान वयातच मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Baladisha Children's Art Exhibition
Skin Care Tips For Women: महिलांसाठी खास स्किनकेअर रूटीन: चेहऱ्यावर कशाच्या नंतर काय लावले पाहिजे? जाणून घ्या

या प्रदर्शनाला कला क्षेत्रातील मान्यवर, कलाप्रेमी, विद्यार्थी आणि पालकांनी भेट देऊन बालकलाकारांच्या कलाकृतींचे कौतुक केले. हे प्रदर्शन १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे. बालकलाकारांच्या कल्पनाविश्वाला नवी दिशा देणारे आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे ‘बालदिशा’ प्रदर्शन कला रसिकांसाठी एक सुंदर पर्व ठरत आहे.