बदलापूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरूवात केली. आंदोलक आणि पोलिस आमने सामने आले आहेत. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. सध्या बदलापूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. गेल्या सात तासांपासून बदलापूरमध्ये रेलरोको आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मंत्री गिरीष महाजन यांनी आंदोलनकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिले. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीमार केला.
बदलापुरच्या नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अतयाचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंदसोबत आंदोलन करण्यात आले. गेल्या ८ तासांपासून बदलापूरमध्ये आंदोलन सुरू आहे. तर ७ तासांपासून आंदोलनकांनी बदलापूर रेल्वे स्थानाकावर मोठ्यासंख्येने एकत्र येत रेलरोको आंदोलन केले. रेल्वे रुळावर उतरून नागरिकांनी रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे मध्यरेल्वेची वाहतूक कोलमडली. सकाळपासून अंबरनाथ ते कर्जत रेल्वे वाहतूक ठप्प आहे.
पोलिसांनी, मध्य रेल्वे प्रशासनाने आंदोलनकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलनक आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यानंतर सरकारच्या वतीने गिरिष महाजन यांनी देखील आंदोलनकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जवळपास तासभर त्यांनी आंदोलनकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिले. यासर्व घटनाक्रमानंतर पोलिसांनी शेवटी मोठ्यासंख्येने येत आंदोलकांवर लाठीमार केला. पोलिसांनी बळाचा वापर करत जमावाला पसरवले.
पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलकांची धावपळ झाली. यावेळी काहीजण जखमी झाले. काहींना भोवळ आली. तर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने मोठ्याप्रमाणात दगडफेक केली. सध्या बदलापूर रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. संतप्त झालेल्या आंदोलनकांनी बदलापुरमध्ये एसटीवर दगडफेक केली. एसटीच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे बदलापूरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.