Badlapur News: बदलापूरच्या 'त्या' शाळेतील सीसीटीव्ही बंद होते, शिक्षणमंत्र्यांची धक्कादायक माहिती

Deepak Kesarkar On Badlapur Case: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकर परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जाईल अशी माहिती दिली.
Badlapur News: बदलापूरच्या 'त्या' शाळेतील सीसीटीव्ही बंद होते, शिक्षणमंत्र्यांची धक्कादायक माहिती
Deepak Kesarkar On Badlapur CaseSaam Tv
Published On

बदलापुरमध्ये नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ही घटना घडलेल्या शाळेमधील सीसीटीव्ही बंद होते अशी धक्कादायक माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. याप्रकरणासंदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकर परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जाईल अशी माहिती दिली.

दीपक केसरकर यांनी सांगितले की, घटना घडलेल्या शाळेने सीसीटीव्ही बसवले होते पण ते बंद पडले होते. त्यासंदर्भात आम्ही वेगळे परिपत्रक काढणार आहोत. या प्रकरणातील आरोपी अक्षय रामा शिंदे याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत कलम ७४, ७५, ७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर कारवाई होईल.'

Badlapur News: बदलापूरच्या 'त्या' शाळेतील सीसीटीव्ही बंद होते, शिक्षणमंत्र्यांची धक्कादायक माहिती
Badlapur band : चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराविरोधात बदलापूर बंद; शेकडो नागरिकांचा शाळेविरोधात संताप, नेमकी परिस्थिती काय? VIDEO

शिक्षणमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'आरोपीविरोधात ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये पहिल्या कलमात ६ महिने, दुसऱ्यात ३ महिने आणि तिसऱ्या कलमामध्ये १० वर्षे तुरुंगावासाची शिक्षा आहे. म्हणजे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीला एकूण साडेतेरा वर्षांची शिक्षा होऊ शकते. या शिक्षेसोबत दंडही होऊ शकतो. दोन आणि पाच लाखांचा दंड होईल. दंडापेक्षा शिक्षा कडक आहे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.'

Badlapur News: बदलापूरच्या 'त्या' शाळेतील सीसीटीव्ही बंद होते, शिक्षणमंत्र्यांची धक्कादायक माहिती
Badlapur News : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्याला फासावर लटकवा, बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर उतरले; मध्य रेल्वे खोळंबली, VIDEO

शाळांमध्ये सीसीटीव्ही असावेत यावर बोलताना दीपक केसरकर यांनी सांगितले की, 'ज्याठिकाणी शाळांवर आम्ही जबाबदारी टाकली आहे. पण झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील तर झेडपीच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही नसतील तर त्यांनी लक्ष घालावे. पालिकेच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही नसतील तर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची ती जबाबदारी राहिल. प्रायव्हेट स्कूलला सीसीटीव्ही बसवणे अनिर्वाय आहेत. आता प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले जावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.'

Badlapur News: बदलापूरच्या 'त्या' शाळेतील सीसीटीव्ही बंद होते, शिक्षणमंत्र्यांची धक्कादायक माहिती
Badlapur Crime: आरोपीला शाळेसमोरच फाशी द्या, बदलापूरकरांमध्ये प्रचंड संताप, पाहा VIDEO

तसंच, 'चिमुकल्या मुलींच्या कुटुंबाला काही मदत करता येईल, मुलींचे समुपदेशन कसे करता येईल याबाबत आमचे प्रयत्न सुरु आहेत. मुलीची ओळख सांगितली जाणार नाही. कुटुंबाला त्रास होणार नाही. तिला कुठे दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आम्ही मदत करू. राखी सावित्री समिती शाळेमध्ये होती की नाही याची चौकशी होणार आहे. ऑफिसप्रमाणे शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन केली जाणार आहे. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे असे प्रकार घडतात. सीसीटीव्ही सुरू असते तर हा प्रकार घडला नसता.' अशी खंत दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.

Badlapur News: बदलापूरच्या 'त्या' शाळेतील सीसीटीव्ही बंद होते, शिक्षणमंत्र्यांची धक्कादायक माहिती
Badlapur Crime: चौकशी कसली करताय, त्याचा एन्काऊंटर करा; बदलापुरातील घटनेनंतर मनसे नेता संतापला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com