Badlapur News: बदलापुरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार, पोलिस निरीक्षकाची बदली; उद्या शाळा बंद आंदोलन

Physically Assaulted Of 2 Minor Girls In Badlapur: बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आली. नवे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून किरण बालवडकर यांनी पदभार स्वीकारला आहे.
Badlapur News: बदलापुरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार, पोलिस निरीक्षकाची बदली; उद्या शाळा बंद आंदोलन
Badlapur Crime News Saam Tv
Published On

अजय दुधाणे, बदलापूर

बदलापुरमध्ये नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात हलगर्जीपणा करणे पोलिस निरीक्षकाला महागात पडले आहे. बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आली. नवे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून किरण बालवडकर यांनी पदभार स्वीकारला आहे. या घटनेवरून मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. याप्रकरणाच्या निषेधार्थ बदलापूरमध्ये मंगळवारी शाळा बंद आंदोलन केले जाणार आहे.

बदलापूर पूर्वच्या एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. शाळेमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेमुळे बदलापूरमध्ये संतप्त वातावरण आहे. या घटनेमुळे या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ २० ऑगस्ट म्हणजे उद्या शाळेच्या गेटवर आंदोलन करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर आंदोलनाची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

विद्यार्थिनींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिशुवर्गात शिकणाऱ्या ४ वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केले. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. तर याच शाळेतील आणखी एका मुलीसोबत देखील असाच प्रकार झाल्याची माहिती समोर आली.

दोन्ही मुलींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली होती. मात्र रात्री १ वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नव्हता. अखेर मनसेने या प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना संपर्क साधताच एफआयआर नोंदवून घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त केला जात होता. या घटनेमध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर येताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com