Badlapur News : बदलापुरात चाललंय काय? आधी सभापतींना धक्काबुक्की, आता कंत्राटावरून सभापती-पालिका अधिकाऱ्यामध्ये झटापट?

Badlapur News : बदलापूर नगरपालिकेत सभापती वडनेरे आणि पालिका अधिकारी टेंभेकर यांच्यात झटापट झाल्याचे वृत्त आहे. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आरोप करत कामबंद आंदोलन केलं. या घटनांमुळं बदलापुरात चाललंय काय, असा प्रश्न येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.
बदलापूरमध्ये कंत्राटावरून सभापती आणि पालिका अधिकाऱ्यामध्ये झटापट
बदलापूर नगरपालिकेत अधिकारी आणि पाणीपुरवठा समिती सभापती यांच्यात झालेल्या झटापटीनंतर पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं कामबंद आंदोलन.saam tv
Published On: 
  • बदलापूर नगरपालिकेत मोठा गोंधळ

  • पालिका अधिकारी आणि पाणीपुरवठा सभापतींमध्ये झटापट झाल्याचे वृत्त

  • पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचं कामबंद आंदोलन

मयुरेश कडव, बदलापूर | साम टीव्ही

रस्ते, पिण्याचे पाणी आदी नागरी समस्या बाजूलाच राहिल्या; कामांची कंत्राटे, टेंडर यावरून सत्ताधारी-विरोधक आणि आता तर सत्ताधारी-पालिका अधिकाऱ्यांमध्येच सुरू झालेल्या वादाच्या मालिकांमुळे बदलापूर अधिक चर्चेत येऊ लागले आहे. बदलापूर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्येच पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे आणि नगर अभियंता संदीप टेंभेकर यांच्यात जोरदार झटापट झाली. या घटनेच्या निषेधार्थ पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं.

बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये सुरू असलेले वाद संपायचे नाव घेईनात. आता तर सत्ताधारी पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांमध्येही वाद होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी सभापती शिंदे यांना कंत्राटदारानं धक्काबुक्की केली होती. बिल काढण्यासाठी पैशांची मागणी होते आणि जाणूनबुजून कामांची बिले रखडवली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा वाद निवळत नाही तोच आता पुन्हा बदलापूर नगरपालिकेत नवा वाद निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे आणि पालिका अधिकारी संदीप टेंभेकर यांच्यात पालिका कार्यालयातच झटापट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला असून, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं.

बदलापूर पालिकेत आज, गुरुवारी विकासकामांबाबत आढावा बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर पाणीपुरवठा सभापती वडनेरे यांच्या दालनात पालिका अधिकारी टेंभेकर यांच्यात एका कंत्राटावरून शाब्दिक चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाचाबाचीनंतर दोघांमध्ये झटापट झाली. कंत्राटावरून वाद झाला की आणखी कोणता मुद्दा होता, याबाबत निश्चित माहिती समजू शकली नाही. मात्र, कंत्राटावरूनच ही झटापट झाल्याची चर्चा आहे. टेंभेकर यांना मारहाण झाल्याचा आरोप अधिकारी आणि कर्मचारी करत असून, त्यांनी कामबंद आंदोलनही केलं. तर कुठलीही मारहाण झाली नाही, असं सांगून सभापतींनी आरोप फेटाळले आहेत.

पालिका अधिकारी आणि वडनेरे यांच्यात झटापट झाल्याचे वृत्त प्रशासकीय वर्तुळात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर बदलापूर नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी पालिकेच्या प्रांगणात जमा झाले. त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं.

बदलापूरमध्ये कंत्राटावरून सभापती आणि पालिका अधिकाऱ्यामध्ये झटापट
Badlapur News : बदलापुरात परप्रांतीय व्यक्तीच्या ११ हातगाड्या; सत्ताधारी नगरसेवकाचं स्टिंग ऑपरेशन, १००० अनधिकृत हातगाड्यांच्या दाव्यानं खळबळ

आम्ही कुणाचीही दादागिरी सहन करणार नाही, अशा घोषणा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी द्यायला सुरुवात केली. तसेच या घटनेचा निषेधही त्यांनी नोंदवला. काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या आवारातच नियोजन सभापती संभाजी शिंदे यांना भरत नवगिरे या ठेकेदाराने धक्काबुक्की केली होती. आता पुन्हा सभापती आणि पालिका अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. विकासकामे सोडून बदलापुरात वादच चालले आहेत, शहरात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. दरम्यान, आपण कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा शिवीगाळ केली नाही, असे स्पष्टीकरण वडनेरे यांच्याकडून देण्यात आले आहे.

बदलापूरमध्ये कंत्राटावरून सभापती आणि पालिका अधिकाऱ्यामध्ये झटापट
Badlapur : वांगणीतील राजकीय संघर्ष चिघळला; शिंदे गटाचे सदस्याला बेड्या, उपसरपंच शेलार अद्यापही फरार

एखाद्या लोकप्रतिनिधीने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणं, अंगावर धावून जाणं असा प्रकार घडल्यावर कर्मचाऱ्यांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे. लोकसंख्येच्या मानाने पालिकेत कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे कामाचा ताण अधिक आहे. अशा परिस्थितीत काही जणांची कामे उशिराने होऊ शकतात. मात्र त्यातून शिवीगाळ, धक्काबुक्की असे प्रकार होणं चुकीचं आहे. नगरसेवक आणि कर्मचारी दोघांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. यापुढे पालिकेच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ.

मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, बदलापूर नगरपालिका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com